Breaking News

*रामधाम येथे भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न* *चंद्रपाल चौकसे गरिबांचा कैवारी*

*रामधाम येथे भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न*

*चंद्रपाल चौकसे गरिबांचा कैवारी*

रामटेक – 25 एप्रिलला रामटेक जवळील विश्वप्रसिद्ध रामधाम येथे भव्य सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.सुनील केदार,जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मि बर्वे,उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते,अप्पर तहसीलदार प्रेमकुमार आडे,रामटेक चे आमदार ऍड.आशिष जयस्वाल,रामधामचे संस्थापक-संचालक चंद्रपाल चौकसे,भाजपा ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.सोहळ्यात अनेक जोडप्यांचे सामूहिक विवाह संपन्न झाले.


गाव-खेड्यात राहणाऱ्या अनेक वर-वधू च्या गरीब माता-पित्यांना लग्नाचा अवाढव्य खर्च करणे शक्य होत नाही.या गरीब वर्गाची व्यथा आणि परिस्थिती पाहून रामधामचे संचालक आणि प्रसिद्ध पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे हे रामधाम येथे प्रत्येक वर्षी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करतात.याद्वारे गरीबजणांचे त्यांच्या वतीने मोठे कल्याण साधले जाऊन अनेक गरीब कुटुंबातील वर वधूंचे विवाह संपन्न होऊन त्यांच्या दांपत्य जीवनाला सुरुवात होते.आपल्या उत्पन्नाचा १० टक्केतरी वाटा गोरगरिबांच्या कल्याणासाठी खर्च करावा ही आपल्या आईची शिकवण आहे.आणि आईच्या शिकवणुकीप्रमाणेच मी जमेल तितके सामाजिक दायित्व पार पाडण्याचा प्रयत्न करतो असे मार्मिक प्रतिपादन यावेळी चंद्रपाल चौकसे यांनी केले.
चंद्रपाल चौकसे हे क्षेत्रात अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवीत असतात.सामूहिक विवाह सोहळा हा त्यापैकीच एक लोककल्याणकारी उपक्रम आहे.सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनाद्वारे चंद्रपाल चौकसे हे मोठी सामाजिक भूमिका पार पाडत असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित कॅबिनेट मंत्री सुनील केदार,उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते,आमदार आशीष जयस्वाल,जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे,जिल्हा परिषद सदस्य शान्ता कुमरे,भाजपा ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश ठाकरे आदी वक्त्यांनी एक स्वरात व्यक्त केली.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे,अर्चना भोयर,जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे, पंचायत समिती सभापती कला ठाकरे,क्षेत्रातील अनेक जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,सरपंच,स्थानिक अनेक गावातील लोकप्रतिनिधी,अनेक महत्त्वपूर्ण मान्यवर,पत्रकार आणि मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.विवाह सोहळ्यात भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …