Breaking News

*तब्बल तीन वर्षांनी रंगले गडकरी रंगमंच* *दि.24 ऐप्रील ला सायंकाळी पारिवारिक Thank You बेटी व F.D.I.दोन नाटकांचे प्रयोग*

*तब्बल तीन वर्षांनी रंगले गडकरी रंगमंच*

*दि.24 ऐप्रील ला सायंकाळी पारिवारिक Thank You बेटी व F.D.I.दोन नाटकांचे प्रयोग*

सावनेर प्रतिनिधि – सूरज सेलकर

सावनेरः आकार रंगभूमी अँन्ड कलचरल आर्ट अकँडमी व्दारे रविवारी 24 एप्रिल ला राम गणेश गडकरी नाट्य सभागृह, सावनेर सायं,६ वाजता सिनेस्टार व नाट्यकलावंत मुकुंद वसुले यांच्या विषेश उपस्थितीत समाजसेवी उत्तम कापसे यांच्या हस्ते ओमप्रकश पाठराबे,पंकज घाटोडे,किशोर ढुंढेले आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सावनेर तालुक्यातील उदयमान नाट्य कलाकारांकरिता अभिनय कार्यशाळेचे उदघाटन सोबतच लेखक शांतनू दास व भगवती चरण शर्मा यांच्या व्दारे लीखीत व आकाश पौनीकर व्दारे दिग्दर्शीत बेटी बचाओ,बेटी पढाओ या विषयावर “Thank Yoy बेटी” हे मार्मीक तर आंतरराष्ट्रीय व आँनलाईन बाजरपेठी वर आधारित धमाल काँमेडी नाटक “F.D.I. या दोन नाटकाचे प्रयोग नाट्य रसिकांच्या मनोरंजना करिता आयोजित करण्यात आले*

 

*सावनेर क्षेत्रात प्रथमच अभिनय कार्यशाळेची सुरुवात होत असल्याने कला क्षेत्रात आपल्या सुप्त गुणाना तज्ञ कलावंतांचे मार्गदर्शन मीळवून घेण्याकरिता ग्रामीण भागाळतील कलावंत आतुर असल्याचे दिसले.*
*तब्बल तीन वर्षा नंतर “शेक्सपिअर” नावाने ओळखल्या जाणारे थोर साहित्यिक,नाटककार,भाषाप्रभू कै राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीचा वारसा जपणार्या सावनेर नगरीत आकर रंगभूमी अँन कल्चरल आर्ट अकँडमी द्वारे उदयमान रंगमंच कलाकारानां त्यांच्या अभिनयात लपला सुप्त कलावंत शोधून काढण्याकरिता क्षेत्रातीलच नाट्य अभीनेते आकाश पौनीकर यांनी “अभिनय कार्यशाळेची” सुरुवात मान्यवर,नाट्यकलावंत व नाट्यप्रेमींच्या उपस्थित करण्यात आली*


*याप्रसंगी सिनेस्टार व नाट्य कलावंत मुकुंद वसुले तसेच झुंड या मराठी चित्रपटात मायकल ची भुमीका साकार करणारे कलावंतांच्या उपस्थितीचे नाट्यप्रेमींमधे उत्साहाचे वातावरण निर्माण होते*


*उपस्थित मान्यवरांनी आपल्या संबोधनातून सदर उपक्रमाची स्तुती करीत आकार रंगभूमी अँड कल्चरल आर्ट अकँडमी च्या पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दील्या तर उपस्थित शेकडो नाट्यप्रेमींनी एक नव्हे तर दोन दोन नाटकांचा आस्वाद घेत शहरात नाटकांचे प्रयोग सातत्याने होत रहावे असा आग्रह आयोजकांना केला*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …