Breaking News

*टेकाडी उपविभागात कोळशाच्या राखेचा वापर करून तयार करतात कालवा – संजय सत्येकार* *कालवे बनविण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार*

*टेकाडी उपविभागात कोळशाच्या राखेचा वापर करून तयार करतात कालवा – संजय सत्येकार*

*कालवे बनविण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – पारशिवनी तालुका अंतर्गत पेंच पाटबंधारे विभागाच्या टेकाडी उपविभागांतर्गत बोर्डा रोड ते गहुहिवरा रोडकडे जाणाऱ्या कालव्याचे सुमारे चार किलोमीटर ‘अस्तरीकरण’ सिमेंट काँक्रिटी करणाचे काम सुरू आहे. या मध्ये सिमेंटऐवजी कोळशाची राख मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदार जनतेच्या कराच्या पैशातून कालवे बनविण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत. दरवर्षी कालव्याचे काम पुन्हा पुन्हा केले जाते आणि वर्षभरातच ते खराब होते. लोकांच्या गाडीतून मिळणारा पैसा कराच्या स्वरूपात जमा करून या विकासकामांमध्ये गुंतवला जातो. या कामांचा शेतकऱ्यांना फारसा लाभ मिळत नाही. मात्र ठेकेदार व अधिकारी अशी भ्रष्ट कामे करून शासकीय प्रशासन व जनतेची लूट करीत आहेत. एकीकडे शेती आणि पिकांचे नुकसान होत आहे आणि दुसरीकडे खते , कीटकनाशके , बी-बियाणे , डिझेल पेट्रोल चे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. आणि जनतेच्या कराच्या पैशातून असे भ्रष्ट काम करून शेतकर्‍यांच्या नावावर ठेकेदार व अधिकारी लुटत आहेत.
या प्रकरणी शासन व या विभागाचे मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी लक्ष घालून ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाविदर्भ किसान संघटनेचे शेतकरी नेते संजय सत्येकर यांनी केली आहे .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …