*सिरोंचाचे पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी वाचविले तेलंगणातील अनोळखी इसमाचे प्राण*
सीरोंचा तालुका प्रतिनिधी- तिरुपती चिटयाला
*सिरोंचा*…सिरोंचा येथील बसस्थानकातील मुत्रीघरात सायंकाळ ला अंदाजे 4.30 वाजताच्या सुमारास तेलंगणातील एका अनोळखी इसमाने ब्लेडने स्वतःच गळा कापून घेत आत्महत्या करून घेण्याचं प्रयत्न केला होता.
याची माहिती भाजप तालुका अध्यक्ष कलाम हुसेन,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतीश गंजीवार यांना कळताच यांनी घटनेची माहिती सिरोंचा पोलिसांना देऊन त्या गंभीर जखमी अनोळखी इसमाला ऑटोने आणून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून येथील डॉक्टर प्रीतम शाह यांना बोलावून आणून त्या इसमावर उपचार करायला लावले.
ग्रामीण रुग्णालयात त्या गंभीर जखमीवर उपचार सुरू असतांना सिरोंचाचे पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांनी आपल्या टीम सह रुग्णालयात पोहचले.
त्या इसमावर प्रथमोपचार पूर्ण होई पर्यंत पोलीस बांधव व सामाजिक कार्यकर्ते उपस्तीत होते.
डॉक्टर प्रितम शाह यांनी गंभीर जखमी वर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी तेलंगणातील मांचेरियाल ला हलविण्यात आले.
या घटनेची शहरात हळूहळू चर्चा पसरताच आरडा ग्रामपंचायत चे प्रभारी सरपंच बापू रंगूवार, तुमनूरचे युवा सामाजिक कार्यकर्ते किरणकुमार वेमुला,येथील झिंगा ठेकेदार शंकर गरपट्टी सह अनेकांनीं ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली.यावेळी रंगू बापू यांनी त्यांच्या कुटुंबियांशी तेलगू भ्रमण ध्वनी द्वारे संपर्क केले असता अनोळखी इसम हे तेलंगणातील पेद्दपले जिल्ह्यातील रामगिरी येथील असल्याचे माहिती मिळाली असून त्याचे नाव साकेत शंकर बुर्रा असून तो मनोरुग्ण असल्याचे त्यांचे वडिलांनी सांगितले.
सिरोंचाचे पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांनी त्या अनोळखी इसमाला मेंचेरीयल ला नेण्यासाठी किरायाचे अंबुलन्स करून देत त्याचा सोबतीला पोलीस कान्स्टेबल रामू साउल्ला यांना पाठवले.
यावेळी पोलीस निरीक्षक अजय अहिरकर सोबत पोलीस उपनिरीक्षक सेलोकर,ए.एस.आय.रमणे मेजर,पोलीस हवालदार गेडाम,मुळे मेजर, मारांना मडावी,रामू साउल्ला,अतुल,बोडके मेजर,मनीष मेजर आदी उपस्तीत होते.यावेळी पोलिसांनी मोका पंचनामा करून तेलंगणातील वरील इसमाची आत्महत्या करून घेण्याचं घटनेची पुढील तपास सुरू केली आहे.
आज सिरोंचाचे पोलीस बंधू व येथील डॉक्टरांनी आणि येथील सामाजिक कार्यकर्त्यानी तेलंगणातील एका अनोळखी इसमाचे जीव वाचविण्यासाठी अतोनात प्रयत्न केल्याने या सर्वांची सामाजिक कार्याची सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.