Breaking News

*रामटेक तालुक्यात ठिकठिकाणी विविध योजनांचा जागर*

*रामटेक तालुक्यात ठिकठिकाणी विविध योजनांचा जागर*

रामटेक : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने ०१ मे २०२२ रोजी महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात आला.पंचायत समीती रामटेक येथे सभापती कलावती ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गट विकास अधिकारी संदीप गोडशलवार व गट शिक्षणाधिकारी संगीता तभाने यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचा सोहळा पार पडला. सर्व प्रथम संविधानाच्या उद्देशिका सामुहिक रित्या वाचन करण्यात आले.रामटेक येथील समतादूत राजेश राठोड यांनी विविध योजनांची माहिती दिली व सर्व बौद्धिक वर्गाने वंचित घटकांपर्यत योजनांची माहिती पोहचविण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मनोहर वांढरे यांनी केले.याप्रसंगी सहा.गट विकास अधिकारी अशोक मते, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक उईके,शिक्षण विस्तार अधिकारी शालिनी रामटेके,अनिल मडावी, राजेश जगने,मते,खोरगे चंद्रिकापूरे, लेने,निमोना मेंढे सुवर्णा दिवटे उपस्थित होते.तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, गट विकास अधिकारी संदीप गोडशलवार, तहसीलदार बाळासाहेब मस्के, मुख्याधिकारी अर्चना वंजारी,न.प.प्रशासक राकेश सव्वालाखे यांनी व ग्रामीण भागात सर्व ग्राम विकास अधिकारी, समतादूत, अंगणवाडी सेविका,युवा गट व ग्रामदूत यांनी सर्व योजनांचा प्रचार व प्रसार करण्यास सहकार्य केले आणि घडी पत्रिकेचे वितरण करण्यात आले तसेच ग्राम पंचायत, तहसील व पंचायत समिती येथील सूचना फलकांवर विविध योजनांचे माहिती पत्रक जनजागृती करीता लावण्यात आले.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …