*दिव्यांग निधी वाटप विषयी तात्काळ योग्य कार्यवाही व निधी वाटप करण्याची मागणी*
*दिव्यांग बांधवांना निधी वाटप करा – नगरसेवक विनय यादव*
*प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटना कन्हान यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – दिव्यांग निधीतून वर्ष २०१७-२०१८-२०१९ ह्या वर्षाचा निधी मिळाला असुन उर्वरित २०१५-१६ , २०१६-१७ , २०१९-२० , व २०२१ वर्षाची निधी अजुनही दिव्यांग बांधवांना मिळाली नाही . पुर्व मुख्याधिकारी श्री. सतीश गावडे यांना २०१५-१६ , २०१६-१७ ची निधी २०२०-२१ ह्या वर्षात देण्यात येईल असे पत्र देऊन मान्य केले असुन या गंभीर विषयावर नप प्रशासना द्वारे कोणतेही तरतुद करण्यात आली नसल्याने प्रहार दिव्यांन संघटना कन्हान शहर च्या दिव्यांग बांधवांनी नगरसेवक विनय यादव व शहर अध्यक्ष राजु राऊत यांच्या नेतृत्वात नप मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुदे यांना भेटुन या गंभीर विषयावर चर्चा करुन दिव्यांग निधी वाटप विषयी तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली आहे अन्यथा १५ दिवसा नंतर नगर परिषद समोर ठिय्या आंदोलन करणाच्या ईशारा देण्यात आला आहे .
*दिव्यांग बांधवांना निधी वाटप करा – नगरसेवक विनय यादव*
कन्हान नप मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुदे यांना भेटुन या गंभीर विषयावर चर्चा करतांनी नगरसेवक विनय यादव यांनी म्हटले कि जि.आर नुसार दिव्यांग बांधवांना ५ टक्के निधी वाटप करणे गरजेचे असुन नप प्रशासना द्वारे अजुन ही निधी वाटप करण्यात आला नसुन उर्वरित वर्षाचा सुद्धा निधी वाटप केले नसुन नप प्रशासन द्वारे शासनाच्या नियमाचे पालन करण्यात आले नाही . जर कन्हान नगर परिषद प्रशासन शासनाच्या निर्देशाचे पाय मल्ली करत असेल तर हे मोठे गंभीरतेची बाब आहे आणि जर कोणत्याही दिव्यांग बांधवांना त्रास होत असेल तर मी सहन करणार नाही असे नगरसेवक विनय यादव यांनी चर्चा करतांनी म्हटले असुन मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुदे यांना निवेदन देऊन दिव्यांग बांधवांचा उर्वरित व सर्व थक बाकी राहीलेली ५ टक्के निधी वाटप करण्याची मागणी केली आहे अन्यथा १५ दिवसानंतर नगर परिषद समोर ठिय्या आंदोलन करणाच्या ईशारा देण्यात आला आहे .
या प्रसंगी प्रहार दिव्यांग संगठना अध्यक्ष कन्हान शहर राजु राऊत, सचिव प्रविण शेंडे, उपाध्यक्ष राजेश्वरी पिल्ले , सुभाष मेश्राम, वनिता मेश्राम, सागर फरकाडे, मंगेश नितनवरे, अश्विन भिवगडे, प्रविण माने, नलु गोंडाने, रंगराव ठाकरे, जयस रामटेके, इंदु शेंडे, कैलास सुर्यवंशी, सुनिता कारेमोरे सह आदि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज