*उमरेड क्षेत्राचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी कुंवारा भिवसेन तीर्थक्षेत्राला दिली भेट*
*कन्हान येथे भाजपा पदाधिकार्यांनी केला सत्कार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – पारशिवनी तालुक्यातील आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान भिमाल पेन कुंवारा भिवसेन या तीर्थस्थळाला उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुधीर पारवे व त्यांचा मुलगा रोहित पारवे सह आदि भाजपा पदाधिकान्यांनी बुधवार दिनांक २७ एप्रिल रोजी भेट दिली असता त्यांनी पूजाअर्चना करून दर्शन घेतले व मनमोहक तीर्थस्थळ परिसर फिरुन त्यांनी आनंद घेतला . त्यानंतर कन्हान तारसा चौक येथे रामभाऊ दिवटे यांच्या जनसंपर्क कार्यालयत भेट दिली असता भाजपा पदाधिकार्यांनी पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला .
या प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे , माजी नगराध्यक्ष शंकर चहांदे , पारशिवनी तालुकाध्यक्ष अतुल हजारे , डॉ . राजेश ठाकरे , शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , महामंत्री सुनील लाडेकर , अशोक कुथे , युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रतीक वैद्य , युवा मोर्चा तालुका महामंत्री मनोज गिरी , भाजयुमो महामंत्री सौरभ पोटभरे , राहुल किरपान , बंडू ठाकरे , सुरेश बगमारे , शिशुपाल बेंदरे , क्रिष्णा मेंघर , अमोल साकोरे , रिंकेश चवरे , शैलेश शेळके , अमन घोडेस्वार , रविंद्र महाकाळकर , राजेंद्र शेंदरे , पारस यादव , सतीश झलके , सुरेश बगमारे , सोमा ढोरे , दिलीप दुफारे , वासुदेव केदवदे , सुनील सहारे , पारशिवनीचे नगरसेवक राहुल नाखले , क्रिष्णा मेंघर सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज