*जन्मभूमी सेवा मंडळ, वाकोडी तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, निःशुल्क चष्मे वाटप, विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षिसं वितरण*
सावनेर – ०१/०५/२०२२ ला जन्मभूमी सेवा मंडळ, वाकोडी वाचनालयाच्या सहाव्या वर्धापनदिन निमित्य जन्मभूमी सेवा मंडळ, वाकोडी तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, निःशुल्क चश्मा वितरण व विविध क्षेत्रात विशेष उपलब्धी मिळविलेल्या वाकोडी गावातील विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम श्री एकनाथजी महाराज देवस्थानच्या वाकोडी या प्रांगनात आयोजीत करण्यात आले. कार्यक्रमात महात्मे आय बँक आय हास्पिटल, नागपूरचे डॉ. अरविंद डोंगरवार सर यांच्या टीमने 350 नागरिकांचे नेत्र तपासणी केले तसेच जन्मभूमी सेवा मंडळ, वाकोडी तर्फे गरजू लोकांना निःशुल्क 175 चश्मे वाटप केले व विविध क्षेत्रातील डॉ., पत्रकारिता, क्रीडा क्षेत्र, नोकरी अशा विविद प्राविण्य विशेष उपलब्धी मिळविलेल्या 18 विद्यार्थ्यांचा मंडळाकडून सत्कार व बक्षिसं वितरण सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मनोहरजी जुनघरे, सरपंच, वाकोडी, प्रमुख पाहुणे श्री प्रकाश पराते उपसभापती सावनेर, गावातील मान्यवर शांतारामजी खोरगडे, श्री प्रभाकरजी कोहळे, श्री देवाजी मदनकर, श्री गजाननजी खोरगडे, श्री बंडुजी खोरगडे, श्री रमेशजी खोरगडे, श्री. गंगाधरजी पराते, श्री. सुरेश बुरडे, डॉ. रमेश पराते, श्री. अशोक पराते, श्री. विनायक पराते, श्री. रमेश धकाते, श्री. मोरेश्वर बुरडे, श्री. श्रीकांत निमजे श्री. रमणजी पराते, निलेश खोरगडे, श्री. रामेश्वर बुरडे आशिष खोरगडे, सतीश धकाते, श्री रामदासजी सावलीकर, श्री रहिमजी वाघाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज