Breaking News

*आज रमजान ईद , कन्हान पोलीसांनी काढला रुठ मार्च* *परिसरात रमजान ईद महोत्सव शांती पुर्वक साजरा करावा पोलीस निरीक्षक विलास काळे यांचे नागरिकांना आव्हाहन*

*आज रमजान ईद , कन्हान पोलीसांनी काढला रुठ मार्च*

*परिसरात रमजान ईद महोत्सव शांती पुर्वक साजरा करावा पोलीस निरीक्षक विलास काळे यांचे नागरिकांना आव्हाहन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान परिसरात रमजान ईद महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते . परंतु गेल्या दोन वर्षापासुन कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने शासनाने निर्बंध कडक केल्याने रमजान ईद महोत्सव नागरिकांनी आपल्या घरोघरी साजरी करण्यात आली होती . सध्याचा परिस्थिति मध्ये राज्यात सह अनेक ठिकाणी कोरोना चा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने शासनाने निर्बंध हटविल्याने नागरिकांन मध्ये रमजान ईद महोत्सव निमित्य शहरात उत्साह चे वातावरण निर्माण झाले आहे .

या रमजान ईद च्या एक दिवसा अगोदर कन्हान पोलीसांन द्वारे रुठमार्च चे आयोजन करण्यात आले असुन हे रुठ मार्च गांधी चौक , पटेल नगर मस्जिद परिसर फिरवुन आंबेडकर चौक , तारसा चौक , सात नंबर नाका भ्रमण करुन महामार्गा ने गांधी चौक येथे रुठ मार्च चे समापन करण्यात आले . यावेळी कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी नागरिकांना रमजान ईद महोत्सव शांती पुर्वक साजरा करण्याचे आव्हाहन केले असुन या रमजान ईद निमित्य शहरात व परिसरात कोणतीही घटना घडु नये म्हणुन पोलीसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …