Breaking News

*आशा वर्कर यांना पाणी पिण्याचे थर्मास वितरित करुन महाराष्ट्र व कामगार दिवस थाटात साजरा* *शिवसेना कन्हान शहर द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*आशा वर्कर यांना पाणी पिण्याचे थर्मास वितरित करुन महाराष्ट्र व कामगार दिवस थाटात साजरा*

*शिवसेना कन्हान शहर द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – शिवसेना कन्हान शहर द्वारे १मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले व नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित या भीष्ण उन्हात फिरुन घरोघरी माहिती गोळा करुन शासनाला मदत करणाऱ्या २५ आशा वर्करांना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या मार्फत पिण्याचा पाण्याचे थर्मास वितरित करुन व लहान मुलांना आईस्क्रीम वाटप करुन महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस थाटात साजरा करण्यात आला .


या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक अनिल ठाकरे , शहर प्रमुख छोटु राणे , महिला शहर प्रमुख मनिषा चिखले , लता लुंढेरे , चंद्रकुमार चौकसे , दामोदर बंड , हरिष तिडके , अजय चव्हान , चिंटु वाकुडकर , प्रदीप गायकवाड , समशेर पुरवले , रवि कुर्वे , नितु तिवारी , वैशाली श्रीखंडे , वैशाली थोरात , सोमनाथ राणे , जोशीला ऊके , कुंदा मोटघरे , वनिता शेंडे ,
सह आदि शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …