*ब्रेकिंग न्यूज*
*इटगाव शिवार येथे अज्ञात आरोपी ने केला एका अनोळखी इसमाचा खुन*
*परिसरात खळबळ , आरोपी फरार*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन पारशिवनी पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
पारशिवनी – पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत ७ किलो मीटर अंतरावर असलेल्या मौजा इटगाव शिवार ते दिगलवाडी पांधन रोड वर असलेल्या गौरव सादतकर यांच्या शेतात कोणीतरी अज्ञात आरोपी ने मृतक अनोळखी इसमाचा खुन केल्याने पारशिवनी पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक २ मई ला रात्री ७:०० ते बुधवार दिनांक ३ मई ला सकाळी ६:०० वाजता च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपी ने अज्ञात कारणावरुन मृतक अनोळखी पुरुष वय अंदाजे २५ ते ३० वर्ष यास कोणतेतरी हत्याराने पोटावर , खांद्यावर , पाठीवर , गळ्यावर वार करुन जिवनाशी ठार केले व पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने शेतमालक गौरव सादतकर यांचे शेतातील झोपडी व तनसाचा डिगाला आग पेटवुन दिल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न होत असल्याने सदर प्रकरणी सरकार तर्फे पोलीस हवालदार रविंद्र चौधरी पोस्टे पारशिवनी यांचे रिपोर्ट वरुन पारशिवनी पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध ३०२ , २०९ , ४३६ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास पारशिवनी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री सोनवने हे करीत आहे . सदर घटनेला गंभीर्याने लक्षात घेत पारशिवनी पोलीस स्टेशन येथे नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर , अपर पुलिस अधीक्षक राहुल माखणीकर , उपविभागीय पोलीस अधिकारी आर एस चव्हान , व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी भेट दिली आहे .
*मृतकाचे वर्णन -*
वय अंदाजे – २५ ते ३० वर्ष अंदाजे , रंग – गोरा , उंची- 5 फूट 7 इंच अंदाजे , उजव्या हातावर ‘महाकाल’ असे लिहलेले असून दंडावर बजरंग बलीचे टॅटू काढलेले असून हातात कडा घातलेला आहे .गळ्यात ताईत घातलेले आहे .केस- बारीक , अंगात – गुलाबी रंगाचे फुल , बाह्याचे शर्ट , निळ्या रंगाची नाईट पॅन्ट घातलेला आहे .
वरील वर्णनाच्या अनोळखी इसमाबाबत कुठे मिसिंग दाखल असल्यास अथवा कुणी ओळखत असल्यास खालील ठिकाणी संपर्क करुन कृपया त्वरित माहिती द्यावी.
सर्व ठाणेदार यांनी आप आपल्या पोस्टे चे मिसींग रजिस्टर तसेच मागील २ वर्साचे अटक रजिस्टर व वर्णना प्रमाणे चेक करुन मिळुन आल्यास पोस्टे पारशिवनी येथे कळवावे .
1)पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे 9923480804
2)सपोनि राजीव कर्मलवार
9021452760
3)सपोनि जितेंद्र वैरागडे
9420178674
4) सपोनि अनिल राऊत
8668385576
स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांचेशी संपर्क करावा .