मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचे थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहण्याकरिता खापरखेडा येथे जमले हजारो
*खापरखेडा प्रतिनिधि- दिलीप येवले*
महाविकास आघाडी व शिवसेने चे पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी शपथ घेतली या शपथ विधी सोहळ्याचे शिवतिर्थ मुबंई येथील लाईव्ह प्रक्षेपण अशोक झिंगरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख नागपुर यांच्या मध्यवर्ती कार्यालय खापरखेडा येथील मुख्य मार्गावर करण्यात आले होते यावेळी खापरखेडा परिसरातील महाविकास आघाडीच्या स्थानीय नेत्यांनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शपथ विधी सोहळा सार्वजनिक करून हजारो च्या संख्येने परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येवून शपथ विधी पाहला व शपथ विधी संपल्या नंतर स्थानीय नेत्यांनी एकमेकांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले व यावेळी भव्य मिरवणुक खापरखेडा अण्णा मोड ते चौकी खापरखेडा पर्यंत काढण्यात आली शिवसेने चे अशोक झिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने किशोर चौधरी, अमर जैन , सरपंच पुरूषोत्तम चांदेकर, प्रकाश गजभिये, चंद्रशेखर दुपारे , किशोर तांडेकर, राज तांडेकर, सचिन गजभिये , जितेंद्र पानतावणे , पंढरी उके ,सुनील पांडे, अनिल बोरकडे,भुपेन्द्र चतुवैदी, अंकुश सोन्टक्के, प्रविण लांजेवार, प्रविण हाते, रोशन देशभ्रतार, धनराज डेहरिया, किशोर पटमासे, अशोक वंजाळ आदी महाविकास आघाडीचे स्थानीय नेते उपस्थित होते.