*टेकाडी पुलिया जवळ कोळश्याचा ट्रक ची दुचाकी वाहना ला जोरदार धडक* *अपघातात दुचाकी वाहन चालकाचा व सहा महिन्या चा चिमुकल्या मुलाचा मुत्यु , तर पत्नी गंभीर जख्मी* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*टेकाडी पुलिया जवळ कोळश्याचा ट्रक ची दुचाकी वाहना ला जोरदार धडक*

*अपघातात दुचाकी वाहन चालकाचा व सहा महिन्या चा चिमुकल्या मुलाचा मुत्यु , तर पत्नी गंभीर जख्मी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस दोन किलो मीटर अंतरावर असलेल्या टेकाडी पुलिया जवळील महामार्ग नागपुर बयपास वळणावर एका कोळश्याचा ट्रक ने दुचाकी वाहनाला मागुन जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहन चालकाचा व त्याच्या सहा महिन्या चा चिमुकल्या मुलाचा मुत्यु झाला असुन फिर्यादी पत्नी गंभीर जख्मी असल्याने नागपुर येथे उपचार सुरू असुन कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .


प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक २ मई ला दुपारी १:०० ते २:०० वाजता च्या दरम्यान फिर्यादी पत्नी मीना शैलेश चौधरी ही आपल्या पती व मुलासह दुचाकी वाहन क्रमांक एम एच ३४ पी ८३४३ वर डबलसिट मागे बसुन फिर्यादी पत्नी मीना चौधरी यांचे पती मृतक शैलेश चौधरी हे चालवित नागपुर वरुन कन्हान मार्गे बाहेर गावाला जात असतांना टेकाडी पुलिया जवळ एन एच ४४ रोडवर आरोपी ट्रक क्रमांक एम एच ४० वाय ९४९८ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवित आणुन मागुन फिर्यादी मीना चौधरी यांचे पती यांच्या दुचाकी वाहनाला जोरदार धडक मारल्याने फिर्यादी व तिचा पती व मुलगा हे खाली पडले आणि फिर्यादी चे पती व मुलाचे शरीरा वरुन ट्रक चे मागील चाक गेल्याने ते जागीच मरण पावले व फिर्यादी ही गंभीर जख्मी झाल्याने तिचा नागपुर येथे उपचार सुरू आहे .


अश्या फिर्यादी मीना चौधरी यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी ट्रक चालका विरुद्ध २७९ , ३३७ , ३३८ , ३०४-ए , भांदवि , १८४ , १३४(ए) , १३४(बी) , १७७ सहकलम अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात एएसआई गणेश पाल हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …