*कन्हान परिसरात महाराष्ट्र व कामगार दिवस थाटात साजरा*
*विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान परिसरात महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस विविध कार्यक्रमाने विविध संस्था व्दारे थाटात साजरा करण्यात आला .

*आदर्श हायस्कूल विद्यालय व आयडियल कॉन्व्हेट*
आदर्श हायस्कूल विद्यालय व आयडियल कॉन्व्हेट यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या प्रांगणात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन थाटात साजरा करण्यात आला.
रविवार दिनांक १मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनी शाळेच्या प्रांगणात संस्थेचे सचिव भरत सावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .या प्रसंगी हायस्कुल च्या मुख्याध्यापिका सौ.सी.ए.मेश्राम व प्राप्त विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.लता देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमात सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री.जी.डी.यादव यांनी केले.

*येसंबा ग्रामपंचायत कार्यालय कन्हान*
येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस यांच्या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित ग्रामपंचायत सरपंच धनराज हारोडे
यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून झेंडावंदन करण्यात आले . त्यानंतर सरपंच धनराज हारोडे यांनी उपस्थित नागरिकांना महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस विषयी मार्गदर्शन करुन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आले .
या प्रसंगी येसंबा ग्रामपंचायत सरपंच धनराज हारोडे , उपसरपंच रविन्द्र बांगडे , सदस्य पंकेश्वर चकोले , ग्रामसेवक मेघा मेश्राम , आय.सी.आर.पी.सौ.हिराताई चकोले , आशावर्कर सौ.सुषमाताई गजभिये , अंगणवाडी सेविका मायाताई चकोले , अंगणवाडी मदतनिस कांताताई गजभिये , विठ्ठलरावजी महाल्ले , कुमारजी गडे सहित आदि नागरिक व बालगोपाल मोठ्या संख्येत उपस्थित होते.

*बाळासाहेब विचार मंच*
बाळासाहेब विचार मंच द्वारे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस मंच कार्यालय तेजाब कंपनी ग्राउंड येथे साजरा करण्यात आला . कार्यक्रमात ११ कामगारांना पावळे , घमिले, टिकास , हसीया व मिठाई वितरीत करण्यात आले .
या प्रसंगी बाळासाहेब विचार मंच चे अध्यक्ष महेंन्द्र भुरे , उपाध्यक्ष पी.डी. जैस्वाल , सचिव सुनील पिल्ले , डॉ विकास मित्रा , पुरुषोत्तम येनेकर , अमर किरपाने , नानाभाऊ मेश्राम , रुपेश सातपुते , मोती हारोडे , गौरा भिवनकर , अस्मिता वासनिक , एड जोशिला ऊके, वैशाली थोरात , उमा नेवरा , भरत गोखे , अनिल चौरसिया , शुभम घावळे , बंटी हेटे , प्रकाश तिमांडे , अर्जुन देवारे , कुबेर पोटभरे , गुणवंत्ता आंबागडे सह आदि नागरिक उपस्थित होते.

*टेकाडी ग्रामपंचायत कार्यालय कन्हान*

टेकाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित
ग्रामपंचायत सरपंच श्रीमती सुनीता पृथ्वीराज मेश्राम यांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता ध्वजारोहण करण्यात आले . कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांना सरपंच सुनिता मेश्राम यांनी मार्गदर्शन करुन महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी ग्राम विकास अधिकारी आतिशकुमार देशभ्रतार , ग्राम पंचायत सदस्य अरुण सूर्यवंशी , सिंधू सातपैसे , सुरेखा कांबळे , माया मनगटे ग्रामपंचायत कर्मचारी मनोज मोहाडे , विलास सावरकर , सुनीता वानखेडे , मनीष कांबळे सह आदि नागरिक उपस्थित होते .


*शेतात काम करणाऱ्या मजुरांसोबत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा : संजय सत्येकर*
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन औचित्य साधून शेतात काम करणाऱ्या मजुरांसाठी वर्षातील ३६५ दिवस सारखेच असतात, रोज शेतात घाम गाळून परीश्रम करून स्वःताचे आणी कुटुंबासह गाडा ओढत इतरा साठी राबराब कष्ट करणाऱे शेतकरीवर्ग या दिवशी अशाच एका शेतमजुरासोबत बसून त्यांचे तोंड गोड करून त्यांच्याशी काही क्षण इकडे-तिकडे गप्पा मारल्यानंतर महाराष्ट्र दिन शेतात साजरा करण्यात आले यावेळी संजय सत्यकार यांच्यासह डॉ.राहुल महल्ले, सोहन हारोडे, चंद्रकांत महल्ले उपस्थित होते
Maharashtra News Media सच की आवाज