*पारशिवनी येथे भाजपा पदाधिकार्यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देऊन ईद च्या शुभेच्छा दिल्या*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असा रमजान ईदचा सण पारशिवनीत भाजपा पदाधिकार्यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देऊन ईद च्या शुभेच्छा देत रमजान ईद उत्साहात साजरा करण्यात आला .
रमजान ईद निमित्य भाजपा पारशिवनी तालुका पदाधिकार्यांनी रामभाऊ दिवटे यांच्या नेतृत्वात व तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांच्या उपस्थिती मध्ये नगर पंचायत पारशिवनीच्या नगरसेविका गलनाज शकील शेख , पारशिवनी तालुका अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष शकील शेख यांच्या घरी जाऊन त्यांना गुलाबाचे फुल देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या . या प्रसंगी भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , प्रतिक वैद्य , मनोज गिरी , अरशद शेख सह आदि भाजपा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज