*कन्हान येथे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस व सार्वजनिक वाचनालय स्थापना दिवस थाटात साजरा*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस व सार्वजनिक वाचनालय स्थापना दिवस थाटात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेवराव चिकटे आणि प्रमुख अतिथि माणिकराव वाघधरे , गंगाधरराव अवचट , एन के खानजोडे यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या आणि रविंद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि माणिकराव वाघधरे व गंगाधरराव अवचट यांनी महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 च्या निमिर्ति बाबत आणि सार्वजनिक वाचनालय स्थापना दिवस 1मे 1974 पासुन च्या वाटचाली बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेवराव चिकटे यांनी महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस व सार्वजनिक वाचनालय स्थापना दिवस निमित्य उपस्थितांना मार्गदर्शन केले .

कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांना व नागरिकांना अल्पोहार वितिरित करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
या प्रसंगी मनोहर कोल्हे , अभिषेक निमजे , प्रदीप भोंके , वरिष्ठ पत्रकार कमल सिंह यादव , कृणाल कोल्हे , पुष्पा बर्लेवार , अल्का कोल्हे , प्राची गिऱ्हे , मयुरी गिऱ्हे , रवि वानखेडे , उद्य पाटील , आशिष घोरपडे , रवि राणे , चेतन ठाकरे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन दिनकरराव मस्के यांनी केले तर आभार श्याम बारई ग्रंथपाल यांनी मानले .
Maharashtra News Media सच की आवाज