*साक्षोधन कडबे यांना ‘रामटेक भूषण’ सन्मान*

*सामाजिक क्षेत्रात कडबे सरांची अतुलनीय कामगिरी*
रामटेक तालुका प्रतिनिधी :- पंकज चौधरी
रामटेक – भारतीय जनता पार्टी, रामटेक विधानसभा क्षेत्र द्वारा महाराष्ट्र दिनानिमित्त विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अतिथी माजी ऊर्जामंत्री व विधान परिषद सदस्य मा. चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, माजी आमदार मल्लिकार्जुनजी रेड्डी,नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांचे हस्ते सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी आकाशझेपचे सचिव व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांना ‘रामटेक भूषण’ सन्मान सर्वश्री मान्यवर लक्ष्मण केणे, अतुल हजारे, बालचंद बादुले, राजेश जयस्वाल, मनोहर पाठक, व्यंकट कारमोरे, ज्योती कोल्लेपरा आदी भाजपा पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज