*कन्हान पोलीसांनी अवैध रेती वाहतुक करणाऱ्या दहा चाकी टिप्पर ट्रक ला पकडले*
*कारवाई दरम्यान टिप्पर ट्रक व ४ ब्रॉस रेती सह एकुण १२ लाख१६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस १२ किलो मीटर अंतरावरील मौजा नरसाळा शिवारातील नरसाळा ते गांगनेर रोड वर अवैध रित्या रेती चोरून दहा चाकी टिप्पर ट्रकने वाहतुक करतांना मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी दोन आरोपी ला पकडुन त्यांच्या जवळुन एकुण १२,१६,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त करित कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार (दि.६) मे ला पहाटे सकाळी ३:३० ते ४ वाजता दरम्यान कन्हान पोलीस च्या महिला पोलीस उपनिरिक्षक पल्लवी काकडे हया पोलीस सहकार्या सह रात्री पेट्रोलिंग करीत असतांना मिळालेल्या गोपनिय माहिती ने नाकाबंदी करून शिव प्रसाद शोभेलाल लिल्हारे वय २३ वर्ष राहणार.खोब्राबड्डी चोखाळा पोस्ट नगरधन ता. रामटेक यांचे ताब्यातील अशोक लेलैंड कंपनीचे दहा चाकी टिप्पर थांबवुन सदर टिप्पर मध्ये असलेल्या रेती बाबत त्यास परवाना विचारला असता त्याच्या कडे कोणता ही परवाना नसल्याचे सांगुन सदर रेती ही प्रविण भारद्वाज राहणार हिवरा नगरधन ता. रामटेक यांचे सांगण्या वरून दहा चाकी टिप्पर मध्ये अवैद्य चोरीची रेती भरून वाहतुक करित असल्याचे सांगिल्याने आरोपी च्या ताब्यातुन अशोक लेलैंड कंपनीचे दहा चाकी टिप्पर ट्रक क्रमांक एम एच ४० ए के २०१२ किंमत अंदाजे १२ लाख रूपये व टिप्पर मधील चार ब्रास रेती किंमत १६ हजार रूपये असा एकुण १२,१६,००० रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून सदर आरोपी शिवप्रसाद शोभेलाल लिल्हारे हा प्रविण भारद्वाज यांचे सांगण्यावरून टिप्पर मध्ये विनापरवाना अवैध रित्या चोरीची रेती वाहतुक करतांना मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी पोशि निसार शेख यांच्या तक्रारी वरून आरोपी शिवप्रसाद शोभेलाल लिल्हारे व प्रविण भारव्दाज यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक ३७९, १०९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.