Breaking News

*कन्हान आंबेडकर चौक येथुन हिरो माईस्ट्रो कंपनीची दुचाकी वाहन चोरी* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल* *कन्हान परिसरात चोरांचे हौसले बुंलद*

*कन्हान आंबेडकर चौक येथुन हिरो माईस्ट्रो कंपनीची दुचाकी वाहन चोरी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*कन्हान परिसरात चोरांचे हौसले बुंलद*

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस राष्ट्रीय महामार्गावर अर्धा किलो मीटर अंतरावर असलेल्या आंबेडकर चौक कन्हान या वर्दळीच्या स्थळी सकाळी फळ घेण्याकरिता रोडवर उभी ठेवलेली हिरो माईस्ट्रो कंपनीची दुचाकी वाहन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरूवार दिनांक १२ मे ला सकाळी १०:०० ते १०:३० वाजता दरम्यान नथ्थु बालाजी चरडे हे आंबेडकर चौक कन्हान येथे फळांचे दुकानात फळांची खरेदी करीत असतांना त्यांनी हिरो माईस्ट्रो कंपनीचे पांढऱ्या रंगाची दुचाकी वाहन क्रमांक. एम एच ४० ए जी ४४८० व ईंजन क्रमांक जेएफ३३एएडीजीजे२२४८९ आणि चेसिस क्रमांक. एमबीएलजीएफ३२एबीडीजीजे२३१८३ किंमत अंदाजे २५००० रूपये असुन ते रोडवर उभी ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने सकाळी वर्दळीच्या स्थळावरून दुचाकी चोरल्याने चोरांचे चांगलेच हौसले बुंलद होत असल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी नथ्थु बालाजी चरडे यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …