*कांद्री माईंन्स शिवारात पिकअप वाहना मध्ये चोरीचा कोळसा भरणाऱ्या आरोपी ला पकडले*
*स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई , ५ टन कोळसा व महिंन्द्रा बोलेरो पिकअप गाडी सह एकुण ५ लाख ६० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान :- कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री माईंन्स शिवारात झुडपी जंगलामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती वरुन धाड मारली असता एक इसम महिंन्द्रा पिकअप गाडीमध्ये चोरीचा कोळसा भरतांना मिळुन आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपी ला अटक करुन त्यांचा कडुन एकुण ५ लाख ६० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसांना स्वाधिन करण्यात आले .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार ला रात्री च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा पथक कन्हान परिसरात बिनधास्त पणे सुरु असलेले अवैध धंदयावर आळा घालनेकामी पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय बातमीदारा कडुन माहिती मिळाली की कांद्री माईंन्स येथे एक इसम महिंन्द्रा गाडी मध्ये कोळसा लोड करून विक्री करीता नेणार आहे . अशा मिळालेल्या विश्वसनीय खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कांद्री माईंन्स शिवारातील झुडपी जंगलामध्ये छापा मारला असता एक इसम महिंन्द्रा पिकअप गाडीमध्ये कोळसा भरतांना मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवून कोळसा बाबत कागदपत्राची विचारणा केली असता त्याचा कडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र दिसून आले नसल्याने सिक्युरिटी इंचार्ज रविकांत कांडे यांना सदर ठिकाणी बोलवुन शहानिशा केली असता त्यांनी सांगितले की , सदरचा कोळसा हा चोरीचा असल्याचे सांगितल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्ती पंचनामा कारवाई करून आरोपी फारुक अब्दुल्ला शेख यास अटक करुन यांच्या ताब्यातुन ५ टन कोळसा किंमत ६० हजार रूपए व महिंन्द्रा बोलेरो पिकअप गाडी किंमत ५ लाख रुपए असा एकुण किंमत ५ लाख साठ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसांना स्वाधिन केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी रमाकांत कंडे यांच्या तक्रारी वरुन आरोपी फारुख अब्दुल्ला शेख च्या विरुद्ध कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
सदर कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधीक्षक वियजकुमार मगर , अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनात सपोनि अनिल राउत , पोहवा विनोद राउत , ज्ञानेश्वर राउत , पोना प्रणय बनाफर , विरेन्द्र नरड यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली .
Maharashtra News Media सच की आवाज