*अध्यात्मिक वारकरी बाल संस्कार शिबिरास उत्सफुर्त प्रतीसाद*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर – तालुक्यातील पोटा येथील श्री संत फुटाणे महाराज संस्थान पोटा येथे श्री.देवराव वनवे महाराज व संस्थानाच्या विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक वारकरी बाल संस्कार शिबिराची परंपरा असुन मागील दोन वर्षाच्या कालखंडात कोरोनाचे सावट असल्याने हदर शिबिराचे आयोजनात खंड पडला परंतु यावर्षी दिनांक 5 मे 2022 पासून 25 मे 2022 पर्यंत 21 दिवसीय सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.*
*शिबिरात श्रीमद्भगवद्गीता पठण, श्री माऊलींचे हरिपाठ, अभंग, ओव्या, शास्त्रोक्त मृदुंग वादन, गायन, पावल्या व अभंगाच्या चाली आदींवर भर देऊन त्याविषयीची शिकवन व सविस्तर माहीती दीली जाते.*

*बालपणीच मुलांवर झालेले संस्कार त्यांना उन्नतीकरिता त्यांच्या येणाऱ्या भविष्यात वेळोवेळी कामी येत असतात. त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया बांधण्यात मदत करित असतात. त्याकरिता त्यांना शिस्त, सदाचार, आचरण, सद्बुद्धी, कृतज्ञता व कर्तव्यदृष्टी, लहानांशी प्रेम, मोठ्यांचा आदर या सर्व गोष्टी लाभण्याकरिता या शिबिरा प्रसंगी प्रयत्न सुरू आहे . त्याकरिता श्री देवराव महाराज वनवे नागपूर, अध्यक्ष संजयजी वंजार, सचिव चंद्रशेखरजी लांडे, संयोजक परसरामजी भड इत्यादी मिळून या सुंदर कार्यास चालना देत आहेत.*
*तसेच शिबिरात रोज बालकांच्या दैनिक आचरणावर भर दिली जाते. बालकांच्या चांगल्या आरोग्यासाठी व त्यांची शारीरिक क्षमता वाढविण्याकरिता दररोज सकाळी 6-00 ते 7-30 दीड तास पतंजली योग समिती खापरखेडा यांच्या वतीने योग प्राणायाम, सुक्ष्म व्यायाम,सुर्य नमस्कार,आसने,योगासने आदींच्या साहयाने आपल्या शरीरास निरोगी व सुदृढ ठेवण्याचे सुत्रे खापरखेडा पतंजली योग समितीचे पालक संरक्षक श्री अमरचंद जैन ,मुख्य योगशिक्षक लक्ष्मण काळे, प्रतीक करंडे, रंगराव ठाकरे, श्रीमती वंदनाताई इंगळे इत्यादी कार्यरत आहेत. तसेच सहयोग शिक्षक रंजीताताई सोनवाने,अनिल कनोजे, पूनमचंद निनावे, ललिताताई वानखेडे त्यांचे सहकार्याने सुरू आहे.*
Maharashtra News Media सच की आवाज