*कन्हान शहर विकास मंच नवीन कार्यकारणीचा विस्तार*
*नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा व नव्याने प्रवेश घेणाऱ्या सदस्यांचा सत्कार कार्यक्रम थाटात संपन्न*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहर विकास मंच ची नवीन कार्यकारणी घोषित करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा व नव्याने प्रवेश घेणाऱ्या सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा गांधी चौक कन्हान येथे कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नोटबुक , पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .


रविवार दिनांक.१५ मई ला शहर विकास मंच च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा व नव्याने प्रवेश घेणाऱ्या सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक कन्हान येथे करण्यात आले असुन कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रूंघे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . कन्हान शहर विकास मंच गेल्या चार वर्षापासुन सातत्याने शहरातील विविध विषय , समस्या प्रशासना समोर ठेऊन सोडविण्याचे कार्य करीत असुन सामाजिक कार्यक्रम सुद्धा करीत आहे. या अनुषंगाने मंच मध्ये काही पद फेरबदल करून पुढे मंच मजबुत व क्रियाशील करण्याकरिता मंच अध्यक्ष ॠषभ बावनकर च्या प्रमुख उपस्थिती मध्ये बैठक घेऊन विचार विमर्स करून सर्वांनुमते मंच उपाध्यक्ष म्हणुन महेंद्र साबरे , सचिव सुरज वरखडे , सहसचिव प्रकाश कुर्वे , कोषाध्यक्ष महेश शेंडे यांची नियुक्ती करण्यात आली . तर भरत सावळे, प्रभाकर रूघे हयांची मंच मार्गदर्शक म्हणुन निवड करून त्यांचे नोटबुक , पेन व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. शहर विकास मंच चे सातत्याने सुरू असलेले कार्य पाहता युवकांनी मंच मध्ये प्रवेश केल्याने हरीओम प्रकाश नारायण , अनुराग महल्ले , कृणाल राजपुत , वैभव थोरात , प्रविण हुड , हिमांशु डाफ , तेजस उमाळे सह प्रवेश घेणाऱ्या सर्व सदस्यांचा मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या हस्ते नोटबुक, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन महेंद्र साबरे यांनी तर आभार ऋृषभ बावनकर यांनी व्यक्त केले .
Maharashtra News Media सच की आवाज