Breaking News

*रोहणा रेती घाट वर उपविभागीय पोलीस अधिकारी व खापरखेड़ा पोलीसांची धाड , तीन आरोपी अटक* *कारवाई दरम्यान एक ब्रास रेती , ६ चक्का ट्रक व एक जेसीबी मशीन असा एकुण १४ लाख ३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त*

*रोहणा रेती घाट वर उपविभागीय पोलीस अधिकारी व खापरखेड़ा पोलीसांची धाड , तीन आरोपी अटक*

*कारवाई दरम्यान एक ब्रास रेती , ६ चक्का ट्रक व एक जेसीबी मशीन असा एकुण १४ लाख ३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त*

खापरखेडा – खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत ७ किलो मीटर अंतरावर असलेल्या रोहणा शिवार येथील रेती घाट वर उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान व खापरखेड़ा पोलीसांनी धाड मारुन दोन आरोपीला ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन एक ब्रास रेती , ६ चक्का ट्रक व एक जेसीबी मशीन असा एकुण १४ लाख ३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन ही कारवाई करण्यात आली .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक १५ मई ला सायंकाळी ६:०० ते ७:०० वाजता च्या दरम्यान आरोपी १) सुभाष गोविंदराव बावने , वय ४० वर्ष राहणार वलनी खापरखेड़ा २) आजम मोहम्मद अली वय २२ वर्ष राहणार तट्टर लाईन वार्ड नं २ वलनी यांनी ३) प्रशांत बहरुपी राहणार रोहणा यांचे सांगण्यावरुन रोहणा घाटाचे शेजारुन एम एच ४० पी ०३७९ क्रमांकाची जेसेबी मशीन चे साह्याने एम एच ३१ सीबी १८७७ क्रमांकाच्या ट्रक मध्ये विना राॅयल्टी एक ब्रास रेती किंमत ३००० रुपयाची लोड करुन मिळुन आले . खापरखेड़ा पोलीसांनी तीन आरोपींना अटक करुन त्यांचा जवळुन१) एक ब्रास रेती किंमत ३००० रुपए , २) एक सहा चक्का ट्रक किंमत ४,००,००० ३) एक जेसीबी मशीन किंमत १०,००,००० असा एकुण १४,०३ ,००० रुपएयाचा मुद्देमाल जप्त करुन ही कारवाई करण्यात आली आहे .


सदर प्रकरणा बाबत खापरखेड़ा पोलीसांनी सरकार तर्फे पोलीस शिपाई नुमान शेख पोस्टे खापरखेड़ा यांच्या तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध ३७९ , १०९ , भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान , पोलीस निरीक्षक हद्यनारायण यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कांक्रेडवार हे करीत आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …