Breaking News

*मोठी बातमी* *डुमरी शिवारात भीषण अपघात* *कोळसाच्या ट्रक ची पायदळी दोन इसमांना धडक , एकाचा मुत्यु , तर एक जख्मी*

*मोठी बातमी*

*डुमरी शिवारात भीषण अपघात*

*कोळसाच्या ट्रक ची पायदळी दोन इसमांना धडक , एकाचा मुत्यु , तर एक जख्मी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – नागपुर – जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वर असलेल्या अण्णा मोड डुमरी येथुन गोंडेगाव खुली कोळसा खदान ला कोळसा भरण्याकरिता जाणाऱ्या ट्रक ने पोलट्री फार्म कडे जाणाऱ्या दोन पायदळी इसमांना जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात रंजित डेहरिया चा घटनास्थळीच मुत्यु झाला तर रोहीत डेहरिया जख्मी झाला.
सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार बुधवार (दि.१८) ला सायंकाळी ७ वाजता दरम्यान अणा मोड डुमरी वरून सामान घेऊन पायदळ येत असतांना नांदगाव पोलट्री फाम जवळ डुमरी कडुन गोंडेगाव खुली कोळसा खदान ला कोळसा भरण्या करिता जाणाऱ्या ट्रकने रोहीत केसरी डेहरिया वय २८ वर्ष व रंजित रामनारायण डेहरिया वय २२ वर्ष राहणार. सिमरिया जि सिवनी (मध्यप्रदेश) हल्ली मु नांदगाव पोलट्री फार्म यांना मागुन जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात रोहीत डेहरिया बाजुला फेकल्या गेला तर रंजित रामनारायण डेहरिया हा ट्रकट्या चाक्यात आल्याने घटनास्थळी त्याचा मुत्यु झाला. तर रोहीत डेहरिया जख्मी झाला. ग्रामस्थानी कोळसाचे ट्रक काही वेळ थांबवुन वेकोलि गोंडेगाव खदान प्रशासनाने आरोपी ट्रक चालकास पकडुन मृतकास नुकसान भरपाई देऊन बेधुंद चालण्यावर प्रतिबंध लावण्याची मागणी करण्यात आली .


सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदना करिता पाठवुन पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …