*अण्णा मोड ते गोंडेगाव रोडवर पोल्ट्री फार्म समोर भीषण अपघात , एकाचा मृत्यु , तर एक गंभीर जख्मी*
*वेकोलि कामठी व गोंडेगाव उपक्षेत्र च्या कोळसा ट्रक वाहतुकीच्या अपघातात अनेकांचा बळी*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला कोळसा ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – अण्णा मोड डुमरी येथुन गोंडेगाव खुली कोळसा खदान ला कोळसा भरण्याकरिता जाणाऱ्या ट्रकने पोलट्री फार्म नांदगाव कडे जाणाऱ्या दोन पायदळी मित्रांना मागुन जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात रंजित डेहरिया च्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने घटना स्थळीच रंजित डेहरिया चा मुत्यु झाला तर रोहीत डेहरिया बाजुला फेकल्या गेल्याने जख्मी झाला.
बुधवार (दि.१८) ला सायंकाळी ७ ते ८ वाजता दरम्यान अणा मोड डुमरी वरून सामान घेऊन पायदळ येणाऱ्या रोहीत केसरी डेहरिया वय २८ वर्ष व मित्र रंजित रामनारायण डेहरिया वय २२ वर्ष दोन्ही राह. सिमरिया जि सिवनी (म प्र) हल्ली मु नांदगाव पोलट्री फार्म या दोन मित्राला डुमरी कडुन गोंडेगाव खुली कोळसा खदान ला कोळसा भरण्याकरिता ट्रकचे लाईट बंद करून जाणाऱ्या कोळश्याच्या ट्रक चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन नांदगाव पोलट्री फाम जवळ दोन्ही मित्राला मागुन जोरदार धडक मारून उडवुन गोंडेगाव कोळसा खदान कडे पळुन गेल्याने रोहीत डेहरिया बाजुला फेकल्या गेला तर रंजित रामनारायण डेहरिया च्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने घट नास्थळीच रंजित डेहरिया चा मुत्यु झाला. तर रोहीत डेहरिया गंभीर जख्मी झाला. ग्रामस्थानी कोळसाचे ट्रक काही वेळ थांबवुन वेकोलि गोंडेगाव खदान प्रशासनाने आरोपी ट्रक चालकास पकडुन मृतकास नुकसान भरपाई देऊन बेधुंद चालण्याऱ्या कोळसा ट्रक व चालका वर प्रतिबंध लावण्याची मागणी करण्यात आली. घटनास्थळी कन्हान पोलीसानी पोहचुन पोलीसानी ग्रामस्थाना शांत करून रंजित चा मुत्युदेह कामठी उपजिल्हा रूग्णालयात उत्तरिय तपासणी करिता पाठवुन घटनास्थळाचा पंचनामा करून जख्मी फिर्यादी रोहीत डेहरिया च्या तोंडी तक्रारीने कन्हान पोलीसांनी आरोपी कोळसा ट्रक चालका विरूध्द अप क्र २९९/ २०२२ कलम २७९, ३३७, ३०४ भादंवि, सहकलम १८४, १३४, (ए) (बी) मो वा का अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन फरार कोळसा ट्रक व चालकाचा शोध घेत आहे.
वेकोलि कामठी व गोंडेगाव उपक्षेत्रा अंतर्गत कामठी , इंदर व गोंडेगाव या तिन्ही कोळसा खुली खदान मधुन महाजनको ला डुमरी रेल्वे कोळसा यार्ड मध्ये ट्रकने कोळसा वाहतुक करण्यात येते. ट्रक चालकच असतो क्लीनी अर नसतोच, टाळपत्रीने कोळसा सुध्दा झाकलेला नसतो. असे इतर सर्व नियम धाब्यावर टागुन ट्रक च्या जास्त ट्रिप होण्याकरिता ट्रक चालक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे ट्रक चालवित असल्याने या रस्त्यावर कोळसा ट्रकच्या वाहतुकीने अपघात होत अनेकांचा बळी जातो. पंधरा दिवसा पुर्वी (दि.२) मे २०२२ ला टेकाडी महामार्ग बॉयपास वळणावर कोळसा भरलेल्या ट्रकने दुचाकीला धडक मारल्या दुचाकी चालकाचा घटनास्थळीच मुत्यु झाला होता तर त्याची पत्नी व छोटेशे मुल जख्मी झाले होते. कोळसा खुली खदान ते डुमरी रेल्वे कोळसा यार्ड परिसरात अनेक अपघात कोळसा वाहतुकीच्या ट्रकने तसेच कोळसा चोरीने होत असुन अनेक निर्दोष लोंका चे बळी जात असल्याने वेकोलि प्रशासन, आरटीओ, वाहतुक पोलीस आदी संबधित प्रशासनाने या कोळसा वाहतुकीच्या ट्रकवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करून होणाऱ्या अपघातावर त्वरित अंकुश लावुन नियमित लक्ष देण्यात यावे. अशी मागणी परिसरातील ग्रामस्था कडुन जोर धरू लागली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज