*हरविलेल्या 07 वर्षीय मुलाला केले आजीच्या स्वाधीन*

*आँपरेशन मुस्कान चे फलित*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः सावनेर पो.स्टे.हद्दीतील बस स्थानकावर दि.01 डिसेंबर2019 रोजी सायंकाळी 6-00 च्या दरम्यान नामे रविन्द्र सुरेश परतेकी वय 07 वर्ष हा बस स्थानक परिसरात रडत असल्याचे पोलीस उप निरिक्षक जूनूनकर व त्यांचे सहकारी पो.का.सतीश व सहकारी यांच्या निदर्शनास येताच त्यानी त्याला विचारपुस केली असता पोलिसांच्या भीतीपोटी तो काही बोलत नसल्याने काही समाजसेवींच्या पुढाकार घेतल्याने त्यानी आपले नाव रविन्द्र सुरेश परतेकी असे सांगत हरविन्याचे कारण सांगत तो खापा पो.स्टे अंतर्गत असलेल्या कोदेगाव येथे आजी व मामा जवळ राहत असल्याची माहिती दीली.*
*त्यानूसार रात्री 10-00च्या दरम्यान पो.उ.नी.जुनूनकर व त्यांचे सहकारी यांनी मुलाची आजी सरस्वती तारचंद म्हरसकोल्हे व मामा भरत ताराचंद म्हरसकोल्हे यांचे घर गाठून मुलाला आजी व मामाचे स्वाधीन केले*
*काय आहे आँपरेशन मुस्कान ७*
*पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सुचने नुसार “आँपरेशन मुस्कान ७” ही योजना सुरु करण्यात आली असुन सदर योजना ही 01 डिसेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत विशेषतः राबविण्यात येत असुन यात हरविलेले मुल,मुली अथवा घर सोडून आलेले संशयित,हाँटेल,ढाबा,कारखाने इतर ठिकाणी कार्यरत मुले,मुली अथवा अनओळखी इसमं आदिं संशयितांची ओळख पटवून त्यांना त्यांचे परिवाराशी मिळवून देण्याकरिता संपुर्ण राज्यात पोलीस प्रशासन पुढाकार घेऊण हरविल्यांच्या परिवारात परत आनंदी वातावरण निर्माण करणार आहेत म्हणूनच सदर योजनेस “आँपरेशन मुस्कान ७” असे नाव देण्यात आल्याची माहिती पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांनी देत असे संशयित कुठेही आढळत असल्यास त्याची सुचना नजीकच्या पोलीस स्टेशन ला देण्याची विनंती केली असुन आपल्या जरा़शया मदतीने जर आपण कुणाला त्याच्या परिवारा सोबत भेट घडवून देण्याकरीता पोलिसांना सहकार्य करावे अशी विनंती याप्रसंगी केली तर हरविलेला आपला चिमुकला नातू सुखरुप घरी पोहचून दील्याबद्दल चिमुकल्याची आजी सरस्वती बाई,मामा व मामी यांनी सावनेर पोलिसांच्या सदर कार्याबद्दल अश्रूपुर्व हास्य “मुस्कान” फुलवीत स्तुती करीत आभार मानले हे विशेष…*
Maharashtra News Media सच की आवाज