*उद्योजक प्रेरणा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न*
*युवकांनो स्वतः च्या कंपनीचे मालक बना – हेमंत वाघमारे*
रामटेक प्रतिनिधि – पंकज चौधरी
रामटेक – दिनांक 23 मे 2022 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,हिंगणा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद रामटेक येथील सभागृहात समतादूत प्रकल्प तालुका रामटेक व मौदा अंतर्गत निर्मित अनुसूचित जातीच्या स्वयं सहाय्यता युवा गटातील तरूण तरूणींना स्वयं रोजगार व उद्योजकता विकास बाबत स्वयंनिर्भर करण्यासाठी उद्योजकता प्रेरणा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सर्व प्रथम महामानवाच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले होते.यावेळी विचार मंचावर mced च्या कार्यक्रम समन्वयक सुष्मा चोरपगार उपस्थित होत्या.बार्टीचे राज्य समनवयक व MCED नागपूर चे प्रकल्प अधिकारी हेमंत वाघमारे यांनी युवकांना उद्योजक बना व स्वतः च्या कंपनीचे मालक बना व इतरांना देखील रोजगार देता येईल ईतके सक्षम व्हा असा संदेश दिला.तसेच प्रती तालुका 30 युवकांची मुलाखत घेऊन 28 दिवसाच्या महत्वपूर्ण निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण देऊन उद्योग स्थापन करून विकसित करण्यासाठी सहकार्य केले जाईल असे हेमंत वाघमारे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामटेक येथील समतादूत राजेश राठोड यांनी केले,सूत्रसंचालन मौदा समतादूत ओमप्रकाश डोले यांनी केले तर आभार प्रदर्शन मौदा समतादूत दुर्योधन बगमारे यांनी केले.कार्यक्रमास नगर परिषद रामटेकचे मुख्याधिकारी अर्चना वंजारी मॅडम यांनी व प्रशासकीय अधिकारी राजेश सव्वालाखे मोलाचे सहकार्य केले.यावेळी रामटेक तालुक्यातील रामटेक, हातोडी,भिलेवाडा,पाचगाव,पटगोवारी,नगरधन,मुसेवाडी,मांद्री,बोरी,मनसर,हिवरा बेंडे, तसेच मौदा तालुक्यातील चाचेर,नरसाळा, खंडाळा, नेरला, बारशी, वांजरा, चिचोली व बेरडेपार येथील स्वयंसहाय्यता युवा गटातील युवक युवती उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज