Breaking News

*मोठी बातमी* *गहुहिवरा पुला जवळ कंटेनर ट्रकची अक्टीवा दुचाकी वाहनास जोरदार धडक* *दुचाकी चालकांचा घटनास्थळीच मुत्यु*

*मोठी बातमी*

*गहुहिवरा पुला जवळ कंटेनर ट्रकची अक्टीवा दुचाकी वाहनास जोरदार धडक*

*दुचाकी चालकांचा घटनास्थळीच मुत्यु*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान परिसरातील गहुहिवरा रोड अंडर पुला जवळ एका कंटेनर ट्रक चालकाने अॅक्टीवा दुचाकी वाहन ला जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहन चालक सतिश श्रोते चा घटस्थळीच मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी ट्रक चालकास ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.


प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक .२४ मे ला सायंकाळी ६:३० ते ७:०० वाजता दरम्यान मृतक सतिश धनराज श्रोते वय ४५ वर्ष राहणार चाचेर हा कन्हान वरून चाचेर ला अॅक्टीवा मोपेड दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४० एजे ८४३० ने चाचेर ला जात असतांना गहुहिवरा मार्गाने कन्हान कडे येणाऱ्या कंटेनर ट्रक क्रमांक एन एल ०१ एबी ६२६१ चा चालक राधेश्याम नंदकिशोर खटीक ह्याने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन समोरून येणाऱ्या अँक्टीवा मोपेड दुचाकी वाहन चालकाला ज़ोरदार धडक मारून अंदाजे १०० मीटर घासत नेल्याने दुचाकी वाहन चालक इसमाचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याने काही वेळेकरिता नागरिकांत रोष असुन तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस हेंड काॅस्टेबल मोहन शेळके व मंगेश सोनटक्के यांनी घटनास्थळी पोहचुन वातावरण शांत केले व घटनास्थळा चा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदना करिता पाठविण्यात आले असुन ट्रक चालकास ताब्यात घेऊन कन्हान पोलीस स्टेशन ला आणले. घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशनचे हेंड काॅस्टेबल मोहन शेळके व मंगेश सोनटक्के हे करीत आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …