*वेकोलि गोंडेगाव परिसरात अवैध चोरीचा पाच कोळसा टाल वर वेकोलि सुरक्षा रक्षक एमएसएफ व कन्हान पोलीसांची धाड*
*कारवाई दरम्यान एकुण ५५. ७०० टन कोळसा जप्त*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला ४ आरोपीवर गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान प्रतिबंधक क्षेत्रात गोंडेगाव वस्ती व भाटिया बंद कोल वासरी च्या मागे वेकोलि चा कोळसा चोरून वेगवेगळया पाच अवैद्य कोळसा टाल सुरू असल्याच्या गुप्त माहीतीने वेकोलि सुरक्षा रक्षक, एमएसएफ व कन्हान पोलीसांची संयुक्त धाड मारून ५५.७०० टन कोळसा किंमत ४,४५,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोस्टे ला चार आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार (दि.२४) मे ला रात्री १ वाजता वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान प्रभारी सुरक्षा अधिकारी हरिराम लालमोहन यादव वय ४३ वर्ष राह. नवीन टेकाडी कॉलोनी हे सुरक्षा रक्षक जंगलु वडान्द्रे, मोहम्मद वजीर, एमएसएफ चे जवान किशन बेलदार, आशिष तांडेकर, शैलेंद्र तायडे यांच्या सोबत गोंडेगाव परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहीती मिळाली की, गोंडेगाव भाटिया बंद कोल वासरी कंपनी च्या मागे अवैद्य कोळश्या टाल वर चोरी चा कोळसा असल्याची माहिती मिळाल्याने हरिराम यादव हे एमएसएफ चे जवान व कन्हान पोलीस यांनी सयुक्त धाड मारली असता अवैध कोळशाचा ढिगारा आढळून आला. हा कोळसा आरोपी मिधुन नाडार चा असल्याने हरिराम यादव यांनी कर्मचाऱ्या सोबत कोळसा ट्रक मध्ये लोडर ने भरला आणि कोळसा खदान च्या काटयावर त्याचे वजन केले असता कोळशाचे वजन १९.७५० किलो होते. ८ हजार रुपये प्रति टन प्रमाणे कोळशाची किंमत १,५७,६०० रुपये असुन कोळसा डेपो मध्ये जमा केला. कन्हान पोलीसांनी फिर्यादी हरिराम यादव यांच्या तक्रारी वरून आरोपी मिथुन नाडार विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला.
ही कारवाई करून परत येताना गोंडेगाव वस्ती शितला माता मंदीर च्या मागे वेकोलि प्रतिबंधित क्षेत्रात आरोपी १) मिथुन नाडार यांचे अवैद्य कोळसा टाल वर १३ टन १०० किलो किमत १, ०४,८०० रू. चा चोरीचा कोळसा मिळाला. २) उमेश पानतावने यांचे अवैद्य कोळसा टालवर ७ टन ३०० किलो कोळसा किंमत ५८,२०० रूपये, ३) भुंजग महल्ले यांचे अवैद्य कोळसा टालवर ६ टन १५० किलो किंमत ४९,२०० रूपये, ४) फारूख अब्दुला यांचे अवैद्य कोळसा टाल वर चोरीचा कोळसा ९ टन ४०० किलो. किमत ७५,२०० रूपयाचा मिळुन आल्याने वेकोलि प्रभारी सुरक्षा अधिकारी हरिराम यादव यांनी कर्मचाऱ्या सोबत कोळसा ट्रक मध्ये लोडर ने भरला आणि कोळसा खदान च्या काटवर त्याचे वजन करून चार ही अवैद्य टालवरील कोळशाचे वजन ३५.९५० टन किंमत २,८७,४०० रूपये आणि बंद भाटिया कोल वासरी मागचा कोळशाचे वजन १९.७५० किलो होते. ८ हजार रुपये प्रति टन प्रमाणे कोळशाची किंमत १,५७,६०० रुपये असा पाच ही कार्यवाई तील एकुण ५५,७०० टन कोळसा किंमत ४,४५, ००० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून गोंडेगाव खुली खदान च्या कोळसा डेपो मध्ये जमा करून कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी वेकोलि प्रभारी सुरक्षा अधिकारी हरिराम यादव यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी आरोपी १) मिथुन नाडार राह. पवनी, २) उमेश पानतावने राह. कांद्री , ३़) भुंजग महल्ले राह टेकाडी, ४) फारूख अब्दुल राह. कांद्री यांचे विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान थानेदार विलास काळे यांचे मार्गदर्शनात पो हवा. मोहन शेळके हे करित असुन आरोपी चा शोध घेत आहे.