Breaking News

*मरियम अम्मा दर्गा गाडेघाट येथे २८ मे पासुन तीन दिवसीय वार्षिक उर्स*

*मरियम अम्मा दर्गा गाडेघाट येथे २८ मे पासुन तीन दिवसीय वार्षिक उर्स*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान परिसरातील नजीकच्या गाड़ेघाट येथील हुजूर मरियम अम्मा दर्गा येथे (दि.२८) ते (दि.३०) मे पर्यंत १५० वा तीन दिवसीय वार्षिक उर्स चे आयोजन करण्यात आले आहे.


हुजूर मरियम अम्मा दर्गा गाड़ेघाट येथे १५० वा तीन दिवसीय वार्षिक उर्सचे शनिवार (दि.२८) मे २० २२ ला मिलाद शरीफ कार्यक्रमाने उर्सची सुरूवात करण्यात येईल. रविवार (दि.२९) मे ला दुपारी १ वा. दर्ग्या पासुन शाही संदल काढण्यात येऊन हा संदल कन्हान शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौकातुन रेल्वे स्थानक परिसरात पोहचेल. तिथे संत बाबा ताजुद्दीन दर्गा ताज बाग नागपुर येथील संदल सहभागी होऊन दोन्ही संदल मिळून रेल्वे माल धक्का, गहुहिवरा रोड चौक, तारसा चौक, आंबेडकर चौकातुन पिपरी मार्गे गाड़ेघाट येथे पोहचेल. सायंकाळी ६ वाजता परचम कुशाई नंतर हुजूर मरियम अम्मा यांना शाही चादर पेश करून महाप्रसाद वितरित करण्यात येईल . सोमवार (दि.३०) मे ला सकाळी क़ुराण खानी, कुल शरीफ फातेहा करून उर्सचा समारोप करण्यात येईल. या तीन दिवसीय उर्सच्या कार्यक्रमाचा कन्हान परिसरातील भाविक भक्ता नी लाभ घ्यावा. असे आवाहन सज्जादानशीन ताजी तब्रेजुद्दीन, ताजी तनवीरूद्दीन व ताजी मुस्तफीजुद्दीन हयांनी केले आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …