*वृक्ष संवर्धन ही काळाची गरज*

*वृक्ष संवर्धन ही काळाची गरज*

कोंढाळी प्रतिनिधी – दुर्गाप्रसाद पांडे

कोंढाळी – वसुंधरेवरील म्हणजेच पृथ्वीवरील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे, तसेच पुढील पिढय़ांसाठी त्यांचे संवर्धन करणे, मानवनिर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे. याविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत.


वृक्षारोपण ही काळाची गरज असून वृक्षसंवर्धन ही त्यांचे पेक्षा ज्यास्त गरजेचे आहे.विद्यमान परिस्थितीत पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे.अश्या परिस्थितीत वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज आहे. असे मत लाखोटीया भुतडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश राठी यांनी या संस्थेच्या विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, सी बी एस ई व प्राथमीक शाळांचे शैक्षणिक व शिक्षकेत्त विभागाचे सर्व शिक्षकांचे उपस्थितीत कनिष्ठ महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण प्रसंगी महत्वाचे मार्गदर्शन कले. 28मे हा संस्था अध्यक्ष राजेश राठी यांचा वाढदिवस प्रसंगी करण्यात आलेले वृक्षारोपणाचे प्रत्येक झाड जगले पाहिजे असे आवाहन ही या प्रसंगी करण्यात आले.

या वाढदिवसानिमित्त येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात पोहचून रूग्णांना फळवाटपा सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष मधुसुदन राठी, नितीन भट्टड,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गणेशराव सेंम्बेकर, सी बी एस ई च्या प्राचार्या डाॅ ज्योती राऊत तसेच तिन्ही शाळांचे उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, परिक्षा प्रमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्त स्टाफ उपस्थिती होता.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …