*ग्राम पंचायत हद्दीतील घाणीमुळे आरोग्यावर दुष्परिणाम ,अर्ज देऊनही ग्राम पंचायत चिकणी कडून दुर्लक्ष*
*गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन*
वरोरा प्रतिनिधी – जुबेर शेख
वरोरा :- वरोरा तालुक्यातील चिकणी ग्राम पंचायत हद्दीतील रेखा प्रभाकर नन्नावरे व आकाश अशोक चतुरकर यांच्या घरा मागील खाली जागेवर घानीचा प्रादुर्भाव असल्याने दुर्गंधी असल्याने दरवर्षी येणाऱ्या वरील पाऊसाच्या पाण्याने घानीचा प्रसार खुप होतो.
या घानीच्या प्रसारामुळे वार्डातील पाणी दुषित होत आहे. त्यामुळे ते पिण्याचे पाणी पिण्या योग्य नाही व आरोग्याला हानी निर्माण झाली आहे. तिथे असलेले खत डाहुले यांचे शेणखत, कुडा-कचरा असुन त्यानी अजुन पर्यंत हटविले नाही. शेणखत, कुडा-कचरा हटविण्यात यावा म्हणुन ग्रामपंचायतीला तक्रार दिली असता ग्रामपंचायतनी (सरपंच, उपसरपंच, सचिव साहेब तसेच ग्रामपंचायत कमेटी) कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही. त्यामुळे आम्हाला या घानीचा प्रसार होत असुन त्याचा त्रास गावातील नागरिकांना होत आहे आणि लवकरच मान्सुनला (पाऊसाळा) सुरूवात होत असुन येणाऱ्या पाऊसाच्या अगोदर तेथील शेणखत, कुडा-कचरा तेथील हटविण्यात यावा. जर शेणखत, कुडा-कचरा हटविला नाही तर आरोग्याला धोका निर्माण होवू शकतो या विनंतीवर मान्सुन चे दिवस लक्षात घेवून तात्काळ न्याय देण्यात यावा अशी विनंती
अर्जदार रेखा प्रभाकर नन्नावरे आकाश अशोक चतुरकर यांनी गटविकास अधिकारी वरोरा यांना केली आहे.