*4 जनावरांपैकी एका गोऱ्याची बिबट्याने केले शिकार*
*बोरडा सराखा शिवारातील घटना*
रामटेक प्रतिनिधि – पंकज चौधरी
रामटेक –पासून 15 कि. मी.अंतरावर असलेल्या बोरडा सराखा येथील शेतकरी श्री.माणिकराव ढोमनजी राऊत (मनोज राऊत) यांच्या शेतात रात्री अंदाजे जवळपास 12 ते 1 वाजताच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या शेतात बांधलेले जनावरे यांच्यावर हल्ला करून एका गोऱ्याला ठार केले आहे.ही घटना गावालगत असलेल्या शेतात घडल्याने या घटनेने संपूर्ण बोरडा गाव हादरून गेल्याचे चित्र निदर्शनास येत आहे.प्राप्त माहिती नुसार मनोज राऊत हे दिवसभर शेतातील काम करून सायंकाळी 8 वाजता घरी गेले.मनोज राऊत हे रोज रात्री शेतात येऊन रात्रभर थांबत असतात.पण काही कारणास्थव रात्री ते शेतात येऊ शकले नाही.याच वेळेचा फायदा घेत अचानक त्यांच्या शेतात बिबट्या येऊन 4 जनावरांपैकी एका गोऱ्याला ठार केले.या घटनेनंतर तात्काळ या घटनेसंबंधीची माहिती वनविभागाला देण्यात आली.त्यानंतर त्यांची टीम घटनास्थळी येऊन पंचनामा केला.पुढील तपास वनविभाग करीत आहे.गावाजवळील शेतात येऊन शिकार केल्याने या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गरीब शेतकऱ्याला त्यांचा मोबदला त्यांना तात्काळ मिळावा असे शेतकऱ्यांचे मत आहे.