*कालव्यातून मोटारपंप चोरणाऱ्या दोघांना अटक*
*मनसर जवळील साटक येथील प्रकार*
मनसर : जवळील साटक येथे सुरू असलेल्या कालव्याच्या दुरुस्तीच्या कामात गुंतलेल्या मशिनरीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार मिळाल्यानंतर 24 तासांच्या आत या प्रकरणातील दोन आरोपींना रामटेक पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, साटक येथे सुरू असलेल्या कालव्याच्या कामाचे मशिनरीचे साहित्य अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची तक्रार ठेकेदाराने दिली होती.
तपासादरम्यान दुचाकीवरून संशयास्पद स्थितीत जाणाऱ्या दोन्ही आरोपींची चौकशी केली असता, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.आशिष नागेश्वर (25,रा. नायलेसरा,बालाघाट) आणि अंकित ठाकूर (19) हे गोकुळपूर, सिवनी, मध्य प्रदेश येथील रहिवासी आहेत. दोन्ही आरोपींना एक दिवसाच्या पीसीआरवर रामटेक न्यायालयात हजर केले. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा भुते,सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे,गजानन बोंद्रे,विलास केंद्रे, प्रज्वल नंदेश्वर,नितेश पिपरोदे,गोपाल डोकरीमारे आदींच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.