*नरसाळा येथील पाण्याचा मोटार पंप अज्ञात चोरट्याने केले चोरी* *फिर्यादी ग्रा.प कर्मचारी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*नरसाळा येथील पाण्याचा मोटार पंप अज्ञात चोरट्याने केले चोरी*

*फिर्यादी ग्रा.प कर्मचारी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस आठ किलो मीटर अंतरावर असलेल्या गट ग्राम पंचायत नरसाळा येथील पाण्या चा मोटार पंप कोणेतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचा तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.


प्राप्त झालेल्या माहिती नुसार गट ग्राम पंचायत नरसाळा येथील पाणी पुरवठा कर्मचारी राजकुमार मनोहर वकलकर हा असुन गावातील पाण्याचा टाकी मध्ये असलेले सबमर्शिथल एल एन कंपनीचे मोटार पंप ५ एच पी किंमत अंदाजे ४,००० रूपयाची ही खराब झाल्याने दुरुस्ती करिता काढुन दुरूस्त करून रविवार (दि.१६) मे ला सायंकाळी ६ वाजता स्वीच रूम मध्ये ठेवुन घरी निघुन गेला. दुसऱ्या दिवशी सोमवार (दि. १७) मे ला सकाळी ७ वाजता दरम्यान राजकुमार वकालकर हा मोटार लावण्याकरिता गेला असता स्वीच रूम चे दार उघडे असुन कुलुप तुटलेले होते. आणि स्वीच रूम मध्ये ठेवलेले मोटाप पंप दिसुन आले नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने स्वीच रूम चे कुलुप तोडुन दार उघडुन अंदर प्रवेश करित रूम मध्ये ठेवलेली मोटार पंप चोरून नेल्याने कन्हान पोस्टे ला राजकुमार मनोहर वकालकर यांच्या तोंडी तक्रारीने अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४६१, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …