*आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातील कृषिदुता तर्फे आसाळा येथील शेतातील मातीचे परीक्षण करण्यात आले*

*आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातील कृषिदुता तर्फे आसाळा येथील शेतातील मातीचे परीक्षण करण्यात आले*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
आसाळा: ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत आनंद निकेतन कृषी महािद्यालयातील कृषीदुता तर्फे आसाळा येथे माती परीक्षण आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्व किंवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी मातीचा नमुना द्यावा माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करावे, असा सल्ला कृषी दुतांनी शेतकऱ्यांना दिला याबरोबरच शेतातील मातीचे नमुने गोळा करून त्यांचे प्रशिक्षण करण्यात आले .मातीमध्ये असणारे घटक जमिनीचा सामू मातीचा प्रकार याविषयी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन देण्यात आले , यावेळी उपस्थित अनुराग गोहो,आदित्य गवळी, अभिषेक गायकवाड स्वप्नील खरपुरिया, नैनेश गायकवाड , अभिजित गायकवाड, या कृषी दूतांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी विद्यार्थांना प्रा डॉ .सुहास पोद्दार सर , डॉ रामचंद्र महाजन सर, डॉ सुशील वाघ यांचे मार्गदर्शन खाली कार्यक्रम पार पडला. यामध्ये शेतकऱ्यांचे चांगले प्रतिसाद लाभले.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …