*रेल्वेखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू…* *वर्धा रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक एक ची घटना…*

*रेल्वेखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू…*

*वर्धा रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक एक ची घटना…*

*सकाळी नऊच्या दरम्यान घडली घटना*
*मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात शव ठेवले*.

*वर्धाः धावत्या आझाद हिंद एक्सप्रेस च्या खाली येऊन महिलेचा अपघाती मृत्यू झाला सदर अपघात सकाळी नऊ वाजता च्या दरम्यान वर्धा रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर घडला आजाद हिंद एक्सप्रेस नागपूर कडे निघालेल्या डाऊन मेन लाईन वर अनोळखी महिला कटल्याची दिसताच तात्काळ टीम ला पाचारण करण्यात आले स्पॉट पंचनामा करून अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.*
*सदर महिलेचा अपघात झाला की घातपात याचा तपास एएसआई मंगला सहारे व पोलीस कॉन्स्टेबल विशाल मिश्रा हे करीत असून महिलेची ओळख पटविण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येते मृत महिले चे शव ठेवण्यात आले आहे मृत महिला गौरवर्ण असुन वय अंदाचे 25 ते 27 वर्षा ची असून उंची 5 फूट असुन तीने शेंदरी रांगाची निळ्या रंगाची पट्टेदार साडी नेसली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …