Breaking News

*शिक्षिका एन डी मेश्राम यांचा सत्कार करून सेवानिवृत्त करण्यात आले*

*शिक्षिका एन डी मेश्राम यांचा सत्कार करून सेवानिवृत्त करण्यात आले*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – आदर्श हायस्कूल कन्हान हिंदी माध्यम येथील माध्यमिक शिक्षिका श्रीमती एन.डी.मेश्राम यांची ३२ वर्ष सेवा देऊन त्या सेवानिवृत्त झाल्याने सर्व शिक्षक, शिक्षिकांनी त्यांचा शाल, श्रीफळ, प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून सेवानिवृत्त करण्यात आले.


मंगळवार (दि.३१) में २०२२ ला आदर्श हायस्कुल (हिंदी माध्यम) शाळेत माध्यमिक शिक्षिका एन.डी. मेश्राम यांनी ३२ वर्ष सेवा प्रदान करून सेवानिवृत्त झाल्याने आदर्श हायस्कुल व्दारे सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था अध्यक्षा श्रीमती पी.आर. द्विवेदी यांच्या हस्ते प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव श्री.भरत सावळे, आदर्श हायस्कुल मुख्याध्यापिका श्रीमती सी. एन. मेश्राम व प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी शिक्षिका एन.डी.मेश्राम यांच्या सेवा कार्याचे कौतुक करून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर शिक्षिका एन.डी.मेश्राम यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करित सेवानिवृत्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …