*सार्वजनिक वाचनालय कन्हान येथे शिवराज्याभिषेक सोहळा दिवस थाटात साजरा*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – ६ जुन शिवराज्याभिषेक सोहळा दिवस सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान व्दारे कार्यक्रमाचे आयोजन करून थाटात साजरा करण्यात आला.
राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा दिवस निमित्य स्वराज दिवस म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकरराव मस्के यांच्या हस्ते व प्रमुख अतिथी पत्रकार कमलसिंह यादव, अशोकराव खंडाईत, अभिषेक निमजे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी ६ जुन १६७४ च्या शिवराज्याभिषेक सोहळा बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित वाचक व सभासद यांच्याकडुन रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवना विषयी व कार्याविषयी वाचन स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित सर्व नागरिकांनी राजे छत्रपती शिवाजी महा राजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून शिवराज्याभिषेक सोहळा दिवस थाटात साजरा करण्यात आला . त्यानंतर सर्व उपस्थितांना अल्पोहार वितरित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी रोशन तांडेकर, रवि वानखेडे, अल्का कोल्हे, मयुरी गिऱ्हे, कृष्णाली कोल्हे, रवि राणे, सुरेंद्र नेवारे, अनिल मोगरे, तेजस मेश्राम, निखील बागडे, कस्तुरी बागडे, निखील मोटघरे, खुशाल मेश्राम, विक्की कनोजे, बंटी परिहार सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन मनोहर कोल्हे यांनी तर आभार श्याम बारई ग्रंथपाल यांनी व्यकत केले.
Maharashtra News Media सच की आवाज