Breaking News

*कन्हान येथे बिरसा मुंडा यांच्या १२२ व्या पुण्यतिथि निमित्य वाहली श्रद्धांजलि* *कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे बिरसा मुंडा यांच्या १२२ व्या पुण्यतिथि निमित्य वाहली श्रद्धांजलि*

*कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे आदिवासी समाजक्रांतीचे जनक व थोर स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या १२२ व्या पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दोन मिनटाचा मौन धारण करुन श्रद्धांजलि वाहुन पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
गुरुवार दिनांक ९ जुन ला आदिवासी समाजक्रांतीचे जनक व थोर स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या १२२ व्या पुण्यतिथि निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच सचिव सुरज वरखडे यांच्या हस्ते व मंच मार्गदर्शक भरत सावळे प्रभाकर रुंघे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन व दोन मिनटाचा मौन धारण करुन श्रद्धांजलि वाहुन पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव सुरज वरखडे , सहसचिव प्रकाश कुर्वे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , अनुराग महल्ले , अक्षय फुले , हरीओम प्रकाश नारायण सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …