Breaking News

*अल्पवयीन मुलींशी लैंगिक अत्याचार व विनयभंगाचे कराटे प्रशिक्षकावर ६ प्रकरणे दाखल* *मुलींवर अतिप्रसंग व विनयभंग करणारा आरोपी गोपाल गोंडाणे अटक*

*अल्पवयीन मुलींशी लैंगिक अत्याचार व विनयभंगाचे कराटे प्रशिक्षकावर ६ प्रकरणे दाखल*

*मुलींवर अतिप्रसंग व विनयभंग करणारा आरोपी गोपाल गोंडाणे अटक*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कराटे प्रशिक्षक असलेल्या आरोपी नराधमाने त्याच्याच क्लासमध्ये येत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीशी अतिप्रसंग व विनयभंग केल्याने पीडीत एका मुलीच्या पालकांनी कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार दिल्याने कन्हान पोलीसांनी वरिष्ठाच्या मार्गदर्शनात आरोपी गोपाल गोंडाणे विरूध्द विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केल्याने आणखी इतर पीडीत मुली व पालकांना हिमत येऊन तक्रार दिल्याने मुलींवर अतिप्रसंग व विनयभंग केल्याचे सहा प्रकरणे नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन ला दाखल करून पुढील तपास सुरू असुन आणखी या नराधमाच्या पिडीत मुली असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या प्रकाराचा छळ कुणावरही झाला असल्यास त्यांनी स्वतः पुढे येऊन तक्रार द्यावी. असे आवाहान महिला मसपोनि निशा भुते हयानी केले आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार आरोपी गोपाल रामेश्वर गोंडाने (४०) राह. विवेकानंद नगर, कन्हान हा कराटे प्रशिक्षक असुन दररोज सकाळी ४ ते ५ पर्यंत रनिंग , व्यायाम तसेच सायंकाळी ७ ते ८ कराटेचे क्लासेस घ्यायचा. पीडिता त्याच्या कराटे क्लासेस मध्ये जात होती. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडीतेस आपल्या दुचाकीवर बसवुन तो क्लासेस कडे न जाता खंडाळा शिवारातील ओवर ब्रिजच्या खाली नेऊन बळजबरीने लैंगिक अत्याचार केला . पीडीतेने ही बाब आपल्या आईस सांगितल्याने फिर्यादी आईने कन्हान पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दिलेल्याने कन्हान पोलिसांनी आरोपी गोपाल गोंडाने याच्या विरुद्ध विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करून महिला पो उपनि लक्ष्मी मल्कुवार या तपास करीत असतांना या प्रकरणात पीडीत मुलीच्या तकारीने आरोपीस अटक केल्याचे माहित झाल्याने आरोपी विरूद्ध दुसऱ्या मुलींनी तकार देण्याची हिंमत केली.
दुसरा गुन्हा सदर आरोपी विरूद्ध दि.७/०६/२० २२ चे २.२५ वा. अप क्र. ३४३/२०२२ कलम ३७६, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला. यामध्ये मौजा गहुहिवरा रोड येथे दि.१२/१२/२०२१ चे सकाळी ४.३० वा. चे सुमारास पीडित मुलगी वय २० वर्ष व आरोपी गोपाल गोंडाने हे विद्यार्थी व कराटे प्रशिक्षक असुन फिर्यादी ही कराटे शिकण्यास आली असता तिला कराटे चे काही स्टेप शिकवण्याचे बहाण्याने घेवुन जावुन तिचेवर अतिप्रसंग केले. तसेच सदर बाब कुणाला सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली . अश्या फिर्यादी यांचे तक्रारीने मसपोनि निशा भुते या पुढील तपास करीत आहे.
तिसरा गुन्हा वरील आरोपी विरूद्ध दि. ७/०६/ २०२२ चे १५.५२ वा विनयभंगचा गुन्हा नोंद केला. यात गहुहिवरा रोड येथे दि.२७/०३/२०२२ चे सकाळी ४.३० वा ते दि.३०/०५/२०२२ चे सकाळी ५.३० वा. चे दरम्यान अल्पवयीन पीडित मुलगी वय १५ वर्ष व आरोपी गोपाल रामेश्वर गोंडाने हे विद्यार्थी व कराटे प्रशिक्षक असुन अल्पवयीन फिर्यादी ही कराटे क्लास ला गेली असता , आरोपीने मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलुन तिचा विनयभंग केला . या प्रकरणी फिर्यादी चे रिपोर्टवरून पो.स्टे.कन्हान येथे आरोपी विरूध्द अप क्र. ३४४/२०२२ कलम ३५४ (अ) भादंवि सह कलम ८, १२ बाल लैगींक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा दाखल करून मसपोनि निशा भुते या पुढील तपास करीत आहे.


चौथा गुन्हा आरोपी विरुद्ध दि. ७/०६/२०२२ चे २०.३४ वा. विनयभंग चा गुन्हा नोंद करण्यात आला. यामध्ये गहुहिवरा सर्विस कन्हान , गोंडेगाव वाचनालय येथे दि.२८/०५/२०२२ चे सकाळी ४.३० वा. ते दि. ३१/०५/२०२२ चे सकाळी ४.३० वा.चे दरम्यान अल्पवयीन पीडित मुलगी वय १७ वर्ष व आरोपी गोपाल गोंडाने हे विद्यार्थी व कराटे प्रशिक्षक असुन अल्पवयीन फिर्यादी ही कराटे क्लासला गेली असता , आरोपीने मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे तक्रारीने पो.स्टे.कन्हान ला आरोपी विरुध्द अप क्र.३४६/२०२२ कलम ३५४ (अ) भादंवि सहकलम ८, १२ बाल लैगीं क अत्याचार प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा दाखल करून मसपोनि शुभांगी वाजे या पुढील तपास करीत आहे.
पाचवा गुन्हा वरील आरोपी विरूद्ध दि.७/०६/ २०२२ चे २१.४८ वा. विनयभंगचा गुन्हा नोंद करण्यात आला. यामध्ये गहुहिवरा सर्विस कन्हान , गोंडेगाव वाचनालय येथे दि. २८/०५/२०२२ चे सकाळी ४.३० वा.ते दि.३१/०५/२०२२ चे सकाळी ४.३० वा.चे सुमारास अल्पवयीन पीडित मुलगी वय १५ वर्ष व आरोपी गोपाल गोंडाने हे विद्यार्थी व कराटे प्रशिक्षक असुन अल्पवयीन फिर्यादी ही कराटे क्लास ला गेली असता, आरोपीने मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे तक्रारीने पो.स्टे.कन्हान येथे आरोपी विरुध्द अप क्र. ३४८/२०२२ कलम ३५४ (अ) भादंवि सहकलम ८, १२ बाल लैगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून मसपोनि शुभांगी वाजे या पुढील तपास करीत आहे.
साहावा गुन्हा वरील आरोपी विरुद्ध दि. ८/०६/ २०२२ रोजी विनयभंगचा गुन्हा नोंद करण्यात आला. या मध्ये गहुहिवरा सर्विस रोड कन्हान येथे दि.६ /१०/ २०१९ चे ६.३० वा. ते दि. ७/१०/२०१९ चे ११ वा.चे सुमारास अल्पवयीन पीडित मुलगी वय १७ वर्ष व आरोपी गोपाल गोंडाने हे विद्यार्थी व कराटे प्रशिक्षक असुन अल्पवयीन फिर्यादी ही कराटे क्लासला गेली असता यातील आरोपीने मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे तक्रारीने पो.स्टे, कन्हान येथे आरोपी विरुध्द अप क्र.३५१/२०२२ कलम ३५४ (अ) भादंवि सहकलम ८, १२ बाल लैगींक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू असुन या प्रकाराचा छळ कुणावरही झाला असल्यास त्यांनी स्वतः पुढे येऊन तक्रार द्यावी. असे आवाहान महिला मसपोनि निशा भुते हयानी केले आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …