*गजभिये ले आऊट व नाका नंबर सात येथे बोरवेल निर्माण करुण देण्याची मागणी*
*प्रभाग क्रमांक १ च्या नागरिकांचे कन्हान नगर परिषद प्रशासनाला निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक १ च्या गजभिये ले आऊट व नाका नंबर सात येथे मागील अनेक दिवसा पासुन पाण्याची फार टंचाई असल्याने स्थानिक नागरिकांनी कन्हान-पिपरी नगर परिषद प्रशासना ला निवेदन देऊन तात्काळ बोरवेल निर्माण करुण देण्याची मागणी केली आहे.
मागील अनेक दिवसान पासुन प्रभाग क्रमांक १ येथील नागरिकांना पिण्याचा पाण्याची फार टंचाई वाढली असुन या प्रभागात नळ नियमित एक दिवसा नंतर येत असुन पाणी सुद्धा पुरेसे येत नाही. एवढेच नव्हेतर पाईप लाईन व विद्युत लाईन मध्ये बिगाड होत एक दिवसा आड येणारे नळ ही येत नसल्याने नागरिकांना दिवसेदिवस पाण्याकरिता फार त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांनी भाजपा कन्हान शहर अनु:सुचित जाती मोर्चा अध्यक्ष संजय रंगारी यांच्या नेतृत्वात व भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर परिषद प्रशासनाचे अधिकारी फिरोज बिसेन यांना भेटुन या गंभीर विषयावर चर्चा करून निवेदन देऊन तात्काळ गजभिये ले आऊट व नाका नंबर सात येथे बोरवेल निर्माण करून देण्याची मागणी केली आहे.
या प्रसंगी सुनिल लाडेकर , सरोज विश्वकर्मा , मधुकर तीतरमारे , धीरज गजभिये , आकाश मोहिनकर , सुरश इटनकर , शैलेश शेळके , मयुर माटे , बाळु नागदेवे , राजेंद्र ऊके , दिपनकर गजभिये , नितेश वासनिक , खेमराज बगडते , शहुल्ली मेश्राम , चंपाबाई गजभिये , रिना पाली , राजश्री रंगारी , ममता भेलावे , निशा बेलेकर , मालनबाई ढोके , वसंता अनकर , परिनिता अनकर , प्रेरणा नागदेवे , शालु बेलेकर सह नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.