*बोरडा येथील शेतशिवारात वीज पडून 2 म्हशींचा मृत्यू*

*बोरडा येथील शेतशिवारात वीज पडून 2 म्हशींचा मृत्यू*


रामटेक तालुका प्रतिनिधी :- पंकज चौधरी
रामटेक – तालुक्यातील बोरडा (सराखा) येथे दि.18/06/2022 ला दुपारी 2 वाजताच्या सुमारास वीज पडून 2 म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.शेतकऱ्यांचे नाव श्री.सीताराम तोंडरे असून त्यांनी सकाळी आपल्या सर्व म्हशी चारून दुपारी एका झाडाखाली बांधल्या. अचानक निसर्गाने आपले रूप धारण करीत बांधलेल्या जनावरांपैकी 2 म्हशींवर वीज पडून त्यात ते मृत्यू झाल्या आहेत,घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली असून चौकशी होणार असल्याची माहिती समोर येती आहे.विशेष म्हणजे त्या दोन्ही म्हशी गरोदर असल्याचे समजते.शेतकऱ्यांना अंदाजे किंमत विचारपूस केल्यास 70,000 सांगितले.संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून पीडित शेतकऱ्याला योग्य तो मोबदला मिळवून द्यावे अशी शेतकऱ्याची मागणी आहे..

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …