*पारशिवनी तालुक्यात शालांत माध्यमिक १० वी परिक्षेचा निकाल ९७. ६८ टक्के*
*तालुक्यातील एकुण २६ शाळे पैकी १७ शाळेचा १०० टक्के निकाल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – पारशिवनी तालुक्यात माध्यमिक शालांत परिक्षा मार्च २०२२ मध्ये इयत्ता १० वी मध्ये तालुक्याचा निकाल ९७. ६८ टक्के लागला असुन एकुण २६ शाळे पैकी १७ शाळेचा निकाल १०० टक्के लागला असुन बाकी ९ शाळेचा सुध्दा ८० टक्के च्या वर निकाल लागला आहे. पारशिवनी तालुक्यातुन माध्यमिक शालांत परिक्षा मार्च २०२२ मध्ये दहावी परीक्षेचा निकाल 97.68 टक्के लागला असून या परिक्षेत १५९५ परीक्षार्थी पैकी १५५८ परीक्षार्थी उत्तीर्ण झाल्याने तालुक्याचा निकाल ९७.६८ टक्के लागला असुन एकुण २६ शाळे पैकी १७ शाळेचा १००% निकाल लागला तर उर्वरित ९ शाळेचा सुध्दा ८० टक्के च्या वर निकाल लागला आहे.
१) नवप्रतिभा माध्यमिक शाळा दहेगाव जोशी, २) बी के सी पी स्कुल कन्हान, ३) लालबहादुर शास्त्री माध्यमिक शाळा बाब्रुवाडा, ४) पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक शाळा कन्हान, ५) विद्या मंदिर हाय स्कुल खदान कोळसा खदान, ६) अखिलेश हाय स्कुल साटक, ७) अखिलेश हायस्कुल माहुली, ८) यशवंत विद्यालय वराडा,९) नारायण विद्यालय (इंग्रजी माध्य.) कन्हान, १०) नारायण विद्यालय (हिन्दी माध्य) कन्हान , ११) चक्रधर प्रभु विद्यालय डोरली, १२) आश्रमशाळा कोलितमारा, १३) साईबाबा आदिवासी आश्रमशाळा टेकाडी, १४) तथागत विद्यालय करंभाड, १५) जिल्हा परिषद हायस्कुल टेकाडी (को.ख), १६) सरस्वती इंग्रजी माध्यमिक शाळा कन्हान, १७) दिल्ली इंग्रजी माध्यमिक स्कुल या १७ शाळेचा १०० टक्के निकाल लागला असुन १) हरिहर विद्यालय पारशिवनी ९८.७० %, २) नुतन सरस्वती विद्यालय टेकाडी ९७. ९१ %, ३) बळीराम दखने हायस्कुल कन्हान ९७.३६ %, ४) धर्मराज विद्यालय कांद्री-कन्हान ९७.०९ % , ५) राणी लक्ष्मीबाई विद्यालय पारशिवनी ९६.२९ %, ६) साईनाथ विद्यालय बोरडा ९६.१५ % , ७) केसरीमल पालीवाल विद्यालय पारशिवनी ९४.६० %, ८) आदर्श हायस्कुल कन्हान ९०.९० %, ९) राष्ट्रीय आदर्श विद्यालय नवेगाव खैरी ८५. १८ %, अशी शाळेची टक्केवारी आहे.
अशी माहिती शाळेतील शिक्षकां कडुन मिळाली आहे . माध्यमिक शालांत परिक्षा मार्च २०२२ मध्ये इयत्ता १० वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा शिक्षकां कडुन व परिसरातुन खुप कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे .