*स्टेट बैंक समोर चारचाकी वाहना ने दुचाकीला समोरुन दिली धडक* *दुचाकी चालक मुशरिफ अंसारी गंभीर जख्मी असल्याने खाजगी रूग्णालयात उपचार सुरू.* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*स्टेट बैंक समोर चारचाकी वाहना ने दुचाकीला समोरुन दिली धडक*

*दुचाकी चालक मुशरिफ अंसारी गंभीर जख्मी असल्याने खाजगी रूग्णालयात उपचार सुरू.*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस एक किमी अंतरावर नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील स्टेट बैंक सामोर चार चाकी वाहन चालकाने दुचाकी वाहना ला समोरून जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक गंभीर जख्मीचा उपचार सुरू असुन कन्हान पोस्टे ला फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार (दि.१४) जुन ला दुपारी १.३० वाजता दरम्यान मोहम्मद आदिल वल्द युसुफ खान यांच्या भाचा मुशरिफ अंसारी हा आपल्या घरून दुचाकी वाहन क्र. एम ४० बी एम ०८३४ ने भाजीमंडी कामठी येथुन कन्हान ला जात असल्याचे आपल्या आई वडीलांना सांगुन निघाला होता. दुपारी २.३० वाजता दरम्यान कन्हान जबलपुर चारपदरी महामार्गावरील स्टेट बैंक सामोर एका ग्रे रंगाची कार वाहन क्र. एम एच ३१ एच ३६७८ इंडिका व्हिसटा च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणे चालवुन चुकीच्या दिशेने चालवित आणुन समोरून मोहम्मद आदिल वल्द युसुफ खान यांच्या भासा मुशरिफ अंसारी च्या दुचाकी वाहना ला ज़ोरदार धडक मारल्याने मुशरिफ अंसारी हा गाडी सोबत खाली पडला आणि बहोश झाल्याने आजु बाजु च्या लोकांनी त्याला रोडच्या बाजुला नेले. त्याचा जवळ असलेल्या फोन द्वारे घटनेची माहिती त्याचा घरच्या लोकांना दिल्याने मोहम्मद आदिल वल्द युसुफ खान यांचे जावई व लहान भाऊ हे आपल्या कार ने घटनास्थळी पोहचले असता तेथील लोकांनी सांगितले की, चारचाकी कार च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन चुकीच्या दिशेने आणुन मुशरिफ अंसारी च्या दुचाकी वाहना ला जोरदार धडक मारली.या अपघातात मुशरिफ अंसारी हा गंभीर जख्मी झाला असुन त्या च्या हाताला, डोळ्याचा खाली, पायाला, कोहणी ला, गुळग्याला मार लागल्याने त्यास प्रथम उपचाराकरिता वानखेडे हाॅस्पीटल येथे नेले असता तेथील डाॅक्टरांनी तपासुन त्यास नागपुर च्या खाजगी रूग्णालयात रेफर केल्याने परिवारातील लोकांनी दुपारी ४ वाजता सिटी हाॅस्पीटल कामठी येथे उपचाराकरिता भर्ती केले असुन मुशरिफ अंसारी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला आयसीयु मध्ये ठेवले असुन सध्या बेहोशी च्या अवस्थेत उपचार सुरू आहे. सदर प्रकरणात कन्हान पोलीसांनी फिर्यादी मोहम्मद आदिल वल्द युसुफ खान यांच्या तोंडी तक्रारीने चारचाकी कार वाहन चालका विरुद्ध कलम २७९, ३३८ भादंवि १८४, १३४ (ए), १३४ (बी), ४, १२२, ११७ मो वा कायदा अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …