Breaking News

सावनेर–स्थानिक के.डी.पवार शिक्षण महाविद्यालयात विद्यार्थ्यामध्ये स्पर्धा परीक्षेविषयी जाणीव जाग्रुती निर्माण व्हावी म्हणून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाला

सावनेर विशेष प्रतिनिधि 

सावनेरस्थानिक के.डी.पवार शिक्षण महाविद्यालयात विद्यार्थ्यामध्ये स्पर्धा परीक्षेविषयी जाणीव जाग्रुती निर्माण व्हावी म्हणून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशालेचे आयोजन करण्यात आले. स्थानिक राम गणेष गडकरी महाविद्यालयाचे कोरडे सर यांनी विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षे विषयी मार्गदर्शन केले..स्पर्धा परीक्षांची कशी तयारी करावी .कोणती पुस्तके वाचावित, तसेच आपल्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, त्यांचा शोध कसा घ्यावा, परीक्षेचे फाॅर्म कसे भरावेत,याविषयी सखोल मार्गदर्शन केले.. तसेच स्थानिक विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी बाहेर जावे लागू नये म्हणून येथेच राम गणेष गडकरी महाविद्यालयात अभ्यासिका उपलब्ध करुन देण्यात आली.जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये स्पर्धामय वातावरण निर्माण होइल.| कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ.एस ए.घोडेस्वार,प्रमुख अतिथी म्हणून राम गणेष गडकरी महाविद्यालयाचे कोरडे सर .उपस्थित होते. कार्यक्रमाला डाॅ भाविका जैन मॅडम, जे . हीरास मॅडम, माडेकर मॅडम, चौधरीमॅडम, बावणकर सर , देशमुख सर, फलके सर , लोणारे सर के.डी.पवार आ.टी.आयचे पिंगे सर, बोरकर सर,मोहतकर सर, रेणूका डी.एड. विद्यालयाच्या राजश्री देशमुख मॅडम तसेच राम गणेष गडकरी महाविद्यालयाचे प्राध्यापक आदींची उपस्थिती होती.कार्यकमाचे संचालन सुमित सिंग ठाकूर याने केले तर आभार शबनम शेख हिने मानले.राष्टृगिताने कार्यकमाची सांगता झाली.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …