Breaking News

*राहुल तीवारी यांच्या वाहनाची जाळपोळ करणाऱ्यास अटक करा*

*राहुल तीवारी यांच्या वाहनाची जाळपोळ करणाऱ्यास अटक करा*

मुख्य संपादक- किशोर ढूँढेले
सावनेरः खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चनकापुर/ वलनी येथील पत्रकार समाजसेवी व पंचायत समीती सदस्य राहुल तीवारी यांचे वाहन जळीत प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी होऊण न्याय मिळावा याकरिता सावनेर तालुका मराठी पत्रकार संघा व्दारे सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मारुती मुळूक यांचे मार्फत मा.पोलीस महानिरीक्षक डाँ. छेरिंग दोरजे तसेच नागपुर जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक मा.विजय मगर यांना निवेदन सादर करण्यात आले.*


*सदर निवेदनातून सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने विनंती करण्यात आलीकी .दि.28 जुन 2022 च्या मध्यरात्री अज्ञात इसमाने पत्रकार,समाजसेवी तसेच पंचायत समीती सदस्य राहुल तिवारी यांच्या घराच्या आवारात उभी असलेली एम एच 40 के.आर.8570 या बुलेरो वाहनाचे काच फोडून जाळण्यात आली.अश्याच प्रकारे 12 जानेवारी 2020 ला ही त्यांचे वाहन जाळण्याचे प्रयत्न झाले हैते.सदर घटनेमुळे पत्रकार बांधव तसेच समाजसेवीत भीतीचे वातावरण निर्माण होत असुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.*


*करीता सावनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंढेले यांच्या नेतृत्वात सदर घटनेचा निषेध नोदवत सदर घटनेची उच्चस्तरीय तपास होणे,आरोपस अटक होऊण कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे जेणेकरून अश्या घटनेची पुनरावुत्ती होणार नाही व असे समाज विघातक कु्त्य करणार्यांवर आळा बसावा करिता खापरखेडा पोलिस स्टेशन येथे दाखल अप.क्र.373/23 भादवी कलम 435अन्वये नोंद असलेल्या सदर घटनेची उच्चस्तरीय तपास होणे व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी करिता सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव लक्ष्मीकांत दिवटे,कार्याध्यक्ष दिपक कटारे,विशेष मार्गदर्शक तेजसिंग सावजी,प्रा.डॉ.योगेश पाटील,पुरुषोत्तम नागपुरकर,अनिल अडकीने,पीयूष झिंजुवाडीया,मुकेश झरबडे आदींच्या उपस्थितीत निवेदन देऊण तातडीने कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …