*पोलिसांच्या सतर्कतेने एटीएम लुटण्यापासून वाचले*

*पोलिसांच्या सतर्कतेने एटीएम लुटण्यापासून वाचले*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले

सावनेर : सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खदान परिसरात असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम पोलिसांच्या गस्तीने लुटण्यापासून बचावले.

*सावनेरः मिळलेल्या माहितीनुसार सावनेर पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती पथकाला रात्री उशिरा माहिती मिळाली की, सावनेर पोलीस ठाण्यांतर्गत काही अज्ञात चोरटे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यामुळे तत्काळ सावनेर येथील एटीमची पहानी करत असतांना लगेच दुसरी सुचना मीळाली की स्टेट बँक आँफ इंडियाच्या एटीएमला टार्गेट केल्या जात आहे म्हणून गस्तीदलाने आपला मोर्चा स्टेट बँकेचे एटीएमच्या दिशेने वळवत शहरातील दोन्ही एटीएमची तपासणी करुण वेकोलिच्या आवारात असलेल्या तिसर्‍या एटीएमवर पोहोचल्यावर अज्ञात चोरट्याने अंधार व पावसाचा फायदा घेत एटीएम फोडण्याचा बेत सोडून लगतच्या दाट झाडीतून पळून जाण्यात यश आले.

*गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर घटनेची माहिती सावनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मारुती मुळूक यांना देताच तेही आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले व चोरट्याचा शोध व पुढील तपास सुरू केला.या घटनेत एटीएम फोडून चोरीकरीता तो एकटाच आला होता आणि गस्तीवर पोलिस पोहोचताच पळून गेला.

*घटनास्थळावरून मिळालेले सीसीटीव्ही फुटेज व बोटांचे ठसे यांच्या आधारे सावनेर पोलीस या एटीएम चोरीच्या घटनेचा तपास करण्याच्या कामात गुंतले आहेत.त्याच घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस ठाण्याचे अधिकारी मारुती मुळूक यांनी सांगितले की डाँग स्काँट,फिंगरप्रिंट तज्ञ इत्यादींची मदत घेऊण सदर चोरट्याचा शोध लावण्यात येत असुन गस्तीदलचे पोलीस कर्मचारी नीलेश तायडे,विजय पांडे, आशिष कारमोरे आदींच्या कर्तव्यनिष्ठता व कार्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …