*माउजर बाळगणाऱ्या आरोपी ला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले*
*कारवाई दरम्यान देशी बनावटीचा माउजर सह एकुण ४०,००० रुपए चा मुद्देमाल जप्त , आरोपी अटक*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान :- कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री खदान येथे आरोपी फारुख शेख यांच्या घरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेड केली असता त्याचा एक लोखंडी हॅण्डमेड देशी बनावटीचा माउजर मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक २६ जुन ला सायंकाळी ६:०० वाजता च्या दरम्यान पोलीस स्टेशन कन्हान परिसरात स्थानिक गुन्हे शाखा पथक हे स्टाॅफ सह पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि आरोपी फारुख अब्दुल्ला शेख वय २४ वर्ष राहणार कांद्री खदान , कन्हान हा आपल्या जवळ अग्निशस्त्र बाळगुन आहे . अश्या विश्वसनीय माहिती वरुन पंचासह फारुख शेख यांच्या घरी जाऊन रेड केली असता आरोपी फारुख अब्दुल्ला शेख यांच्या घराची झड़ती दरम्यान एक लोखंडी हॅण्डमेड देशी बनावटीचा माउजर (कट्टा) किंमत ४०,००० रुपए चा मुद्देमाल बिना परवाना मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या तक्रारी वरून आरोपी फारुख शेख यांच्या विरुद्ध कलम ३/२५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी फारुख शेख यास अटक करण्यात आली असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक फुलझले हे करीत आहे .
सदर कारवाई नागपुर ग्रामीण चे पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर , अपर पोलीस अधीक्षक राहुल माखणीकर , यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात , सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत , पोलीस हवालदार विनोद काळे , ज्ञानेश्वर राऊत , अरविंद भरत , पोलीस नाईक शैलेष यादव , प्रणय बनफर , चालक सहायक फौजदार साहेबराव बहाळे , यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली .