*चारगाव परिसरात अज्ञात मुलीचा मृतदेह आढळला*

*चारगाव परिसरात अज्ञात मुलीचा मृतदेह आढळला*

काटोल :: काटोल पासून 10 किलोमीटरवर असलेल्या चारगाव जवळील वीटभट्टी च्या मागे अज्ञात मुलीचा मृत्यू आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतक युवती हि 18 ते 22 वयोगटातील आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी  अज्ञात आरोपीविरुद्ध भा.द.वी. 302, 201 अनव्यये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

चारगाव जवळील सत्यनारायण अग्रवाल यांच्या शेतात असलेल्या वीटभट्टी समोरील रोड लगत बिहाडीचे झाडाखाली एका मुलीचा मृतदेह पालत्या अवस्थेत, डावे कुशीवर पडून दिसले असता फिर्यादी चारगाव चे उपसरपंच संघपाल बागडे यांनी घटनेची माहिती ठाणेदार यांना दिली. त्यावरून पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचली. 

मृतक मुलगी हि 18 ते 22 वयोगटातील असून तिच्या अंगावर पिवळ्या रंगाचे टी शर्ट व खाली काळ्या रंगाचा पांढऱ्या लांब रंगाचा पट्टा असलेला प्लाझो घातलेला आहे. महिलेच्या चेहऱ्यावर उजव्या डोळ्या जवळ कोणत्यातरी टोकदार हत्याराने दोन घाव असून उजवे कानाला लागून दोन घाव तसेच कानामागे जखम आहे. चेहरा हा रक्ताने माखलेला, उजवे हातावर मनगटाजवळ तीन स्टार गोंडलेले आहे. अज्ञात इसमाने कोणत्यातरी टोकदार हत्यार चेहऱ्यावर भोसकून तिला जीवानिशी ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पळून गेला. पोलिसांनी मृत्यूदेह हा नागपूर येथे पोस्टमार्टेम करिता नेला आहे.

 

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …